शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

अनाथांना मोफत रेशन वाटप अमरावती : अनाथ विकास संस्थेच्या माध्यमातून कोरोनाकाळात अनाथांना एका महिन्याचे मोफत धान्यवाटप करण्यात आले. वैभव ...

अनाथांना मोफत रेशन वाटप

अमरावती : अनाथ विकास संस्थेच्या माध्यमातून कोरोनाकाळात अनाथांना एका महिन्याचे मोफत धान्यवाटप करण्यात आले. वैभव भगत यांच्या पुढाकाराने कोरोनाकाळात अनाथ झालेल्या, वंचित व दुर्लक्षित असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील मुलामुलींना सामाजिक बांधीलकी जोपासत अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. या उपक्रमात अनाथ विकास संस्थेचे प्रदेश अध्यक्ष अमित वासनिक, यश नागीलवार, अश्विनी सोनवने, जयश्री चांदेकर, अनिता कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले.

---------------

फोटो पी ०१ घुरडे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

अमरावती : मल्हार सेना, अहिल्यादेवी महिला संघ, कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पार पडली. मल्हार सेनेचे राज्य उपाध्यक्ष उमेश घुरडे, बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते, शिवसेना तालुकाप्रमुख मनोहर बुध, डॉ. वैभव ढवळे, मीना घुरडे, लक्ष्मण उघडे, सचिन कोल्हे, राजू आगरकर, अवकाश बोरसे, अमर घटारे, गौरी घुरडे, सृष्टी घुरडे उपस्थित होते.

--------------

अल्पवयीन मुलीला पळविले

चांदूर बाजार : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. २९ मे रोजी दुपारी हा प्रकार घडला. शिरजगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी देविदास मन्नासे (२०, रा. आमला, जि. बैतुल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

महिलेचा विनयभंग

चांदूर बाजार : तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आली. ३० मे रोजी रात्री हा प्रकार घडला. चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी नितीन इंगोले (३२, बेलोरा) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ अ , ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला.

--------------

इसमाला मारहाण, महिलेचा विनयभंग

ब्राम्हणवाडा थडी : दुचाकी बाजूला करीत असताना एका इसमाला रॉडने मारहाण, तर महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ करण्यात आली. २९ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास सोनोरी येथे ही घटना घडली. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी याप्रकरणी निखील निमकर, मंगेश निमकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

जिवे मारण्याची धमकी, महिलेचा विनयभंग

ब्राम्हणवाडा थडी : दुचाकी बाजूला लावण्याच्या कारणावरून सोनोरी येथे एका तरुणाला मारहाण करून खून करण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय महिलेचा विनयभंग व अश्लील शिवीगाळ करण्यात आली. २९ मे रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी अनिकेत अंबाडकर, वैभव रडके, नंदू मडघे, देवेंद्र वांगे (सर्व रा. सोनोरी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

------

‘त्या’ अपघाताप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा

ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील सांभोरा गावाजवळ ३० मे रोजी दुचाकी झाडावर धडकल्याने दोघांंचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत अश्विन मरसकोल्हे (१९, रा. रेतवाडी, जि. बैतुल) याच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा दाखल आला. तो स्वत:सह अन्य एका बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. एमएच २७ एजे ३१२९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्याची दुचाकी झाडावर धडकली होती.

-------------

पोटीलावा येथे तरुणाला मारहाण

धारणी : तालुक्यातील पोटीलावा येथे प्रेमलाल पुन्या बेठे (३१) याला काठीने मारहाण करण्यात आली. गवत नेल्याच्या कारणावरून २९ मे रोजी हा वाद झाला. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी चुनीलाल बेठे व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

केली येथे मारहाण, शिवीगाळ

धारणी: तालुक्यातील केली येथील भुरीया सवालकर (६०) यांना दगडाने मारहाण करण्यात आली. मद्यपान करून जोरात ओरडणाऱ्या आरोपीला हटकले असता, २९ मे रोजी हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी आरोपी शिव राजू बेठेकर (रा. केली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

शेतीपयोगी साहित्य जाळले

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जळगाव शिवारातील झोपडीतील ९० नग स्प्रिंकलर पाईप व नोझल असे ६७ हजार रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य जाळण्यात आले. २९ ते ३० मे दरम्यान ही घटना घडली. ते साहित्य अज्ञात इसमाने खोडसाळपणे जाळले, अशी तक्रार शेतकरी किसन आनंद फटे (५५, जळगाव) यांनी मंगरूळ दस्तगीर पोलिसांत नोंदविली. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

मोझरी येथे तरुणाला मारहाण

तिवसा : मोझरी येथे मनोज साहेबराव वानखडे (२७) याला मारहाण करण्यात आली. खुर्ची उचलून घेण्याच्या कारणावरून ३० मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी मंगेश साहेबराव वानखडे (३०, मोझरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

केदार चौकात तरुणावर प्राणघातक हल्ला

वरूड : येथील केदार चौकात सिकलसरी मोहल्लात राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ३० मे रोजी दुपारी १ च्या सुमारास हा प्रकार घडला. अवैध दारूविक्रीबाबत पोलिसांना माहिती देण्याचा आरोप करीत हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी फरदिल सैयद (१८, रा. नया दायरा), शहजाद शाह व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

--------------

आमनेरच्या शाळेतून मोटर लंपास

वरूड : तालुक्यातील आमनेर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतून पाण्याची मोटर व पाईप लंपास करण्यात आला. २९ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.

------------

तरुणावर कुऱ्हाडीने हल्ल्याचा प्रयत्न

दर्यापूर : तालुक्यातील चंद्रपूर येथे विजय थोरात (२८) याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती वाचविण्याच्या प्रयत्नात कुऱ्हाड करंगळीजवळ लागली. ३० मे रोजी नाली साफ करण्याच्या कारणावरून हा वाद झाला. खल्लार पोलिसांनी आरोपी अंबादास चौरे (६५, रा. चंद्रपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

तळणी पूर्णा येथून दुचाकी लंपास

आसेगाव : अचलपूर तालुक्यातील तळणी पूर्णा येथील भैयासाहेब इंगळे यांच्या मालकीची एमएच २७ एझेड ३८२३ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. २७ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

कासमपूर येथील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या आवारात रूपेश पंजाबराव कोरडे (२९, कासमपूर) याने भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. ३० मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. सहायक उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी रूपेश कोरडेविरुद्ध कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------