शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा गल्लीतील पे्रम प्रकरणातून सट्ट्याचा सुगावा

By admin | Updated: May 19, 2017 00:30 IST

येथील सावकारपुरा भागातील १२ मे रोजी उघडकीस आलेल्या क्रिकेट सट्ट्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा असली तरी

प्रेमाची किंमत आठ लक्ष : पोलीस अधिकाऱ्याच्या रजेचा फायदा लोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : येथील सावकारपुरा भागातील १२ मे रोजी उघडकीस आलेल्या क्रिकेट सट्ट्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा असली तरी हा प्रकार अनेक दिवसांपासून कायद्याच्याच आशीर्वादाने सुरू होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सट्ट्याचा अड्डा उघडकीस आणण्याच्या प्रकरणामागे "दिलजले" प्रकारात मोडणारी पे्रमकथा आहे. सराफा गल्लीतील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे तीन वर्षांपासून पानअटाई भागातील एका मुलीशी प्रेमसूत जुळले होते. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयाने तिचे लग्न इतरत्र ठरविले; पण सराफा व्यापाऱ्याच्या मुलाने दूरध्वनीवरून वरपक्षाला या प्रकरणाची माहिती देऊन लग्न फिस्कटवले. ज्या क्रमांकावरून फोन केला गेला, ते सिमकार्ड तपासांती सराफा व्यापाऱ्याच्या "त्या" मुलाचे असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणानंतर मुलीने स्वत: पोलीस ठाणे गाठले; पण तक्रार नोंदविण्याऐवजी प्रकरण मागे घेण्यासाठी तिची समजूत घालण्यात आली. प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसातील विशिष्ट अधिकाऱ्याने मोठी रक्कम घेतल्याची खमंग चर्चा त्यावेळी गावात रंगली होती. ती आता पुन्हा उफाळून आली आहे. प्रकरण दाखल न करण्याचे पाच लक्ष आणि शांत राहण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना तीन लक्ष, अशी आठ लक्ष रुपये त्या व्यापाऱ्याला प्रेमाची किंमत मोजावी लागल्याचा हिशेब अंजनगावातील गप्पांच्या फडांचा विषय ठरला आहे. ज्या व्यापाऱ्यावर हा प्रसंग गुदरला त्या व्यापाऱ्याचे सट्टा चालविणाऱ्या एका इसमाशी विळाभोपळ्याचे वैर होते. त्या इसमाने या प्रकरणाची शक्य तितकी चर्चा गावभर घडवून आणली. व्यापाऱ्याला किती पैसे मोजावे लागलेत आणि पोलिसातील अधिकाऱ्याने किती रक्कम घेतली, या हिशेबाचा त्याने सर्वत्र प्रचार केला. सदर व्यापाऱ्याला हा मुद्दा जसा झोंबला तसाच तो "त्या" पोलीस अधिकाऱ्यालाही अस्वस्थ करून गेला. आपली बदनामी करणारा इसम स्वत: सट्टा व्यवसायात असल्यामुळे त्याला धडा शिकविण्याचे ठरवले गेले आणि क्रिकेट सट्टा पकडला गेला. दरम्यान, ज्या दिवशी सट्टा अड्ड्यावर धाड घालण्यात आली, त्याच दिवशी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीचे आदेश मिळाल्यानंतर रजेवर गेले होते. नेमकी ती संधी साधून सट्टा अड्यावर कारवाई करण्यात आली होती. "लोकमत"ने अंजनगावात बेमालूमपणे तळ ठोकून माहिती मिळविली असता, या प्रकरणाची खोली गहिरी असल्याचे समोर आले. प्रकरण व्यापक आणि धक्कादायक असले तरी पोलीस हात राखून कारवाई करीत आहेत. या प्रकरणातील गुपिते आणि दबाव याविषयीची नवनवीन माहिती समोर येत आहे.