शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या गोळ्यासह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

वरूड : तालुक्यातील ढगा येथील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीसह इस्माईलपूर शिवारातील एका शेतात विहिरीमध्ये मुलीसह ...

वरूड : तालुक्यातील ढगा येथील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीसह इस्माईलपूर शिवारातील एका शेतात विहिरीमध्ये मुलीसह उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. आईचा मृतदेह सापडला, मात्र, सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेहाच पोलिसांचा शोध सुरु होता. अखेर शनिवारी सायंकाळी चार वाजता विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे ढगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस सूत्रांनुसार, मृत महिलेचे नाव प्रियंका मनोहर धोटे (२८), तर मुलीचे नाव स्वरा आहे. महिला गुरुवारी सायंकाळी ४ वाजता घरून निघून गेली होती. ती परत आली नाही म्हणून कुुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, आढळून आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी इस्माईलपूर शिवारात जनार्दन घोरमाडे यांचे शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक योगेश हिवसे, जमादार उमेश बुटले, दीपक पंधरे, सुमीत तिळेकर यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मात्र, तिची मुलगी बेपत्ता होती. तिचा विहिरीत रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता.

शनिवारी सकाळपासून पुन्हा विहिरीतील पाणी उपसणे सुरू होते. अखेर सायंकाळी ४ वाजता स्वराचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना यश आले. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यानंतर माय-लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वरूड पोलीस करीत आहेत.