शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची हत्या की आत्महत्या ?

By admin | Updated: May 24, 2017 00:07 IST

विदर्भ महाविद्यालयाच्या केशवराव भोसले सभागृहामागील विहिरीत एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी खळबळ उडाली.

व्हीएमव्ही परिसरात आढळला मृतदेह : वसतिगृहातील मुलींची चौकशीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ महाविद्यालयाच्या केशवराव भोसले सभागृहामागील विहिरीत एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी खळबळ उडाली. अनोळखी तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गाडगेनगर पोलिसांनी वसतिगृहातील मुलींची चौकशी आरभंली असून यामुलींपैकी कुणी बेपत्ता आहे का, याविषयी पोलीस माहिती काढत आहेत. सोमवारी सायंकाळी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत कार्यरत एक कर्मचारी केशवराव भोसले सभागृहामागील पडिक जमिनीवर असलेल्या विहिरीवरील पाण्याची मशिन सुरु करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना विहिरीत तरूणीचा मृतदेह तरगंताना आढळून आला. त्यांनी ही माहिती प्राचार्य यावले यांना दिल्यावर त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना कळविले. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. २० ते २२ वर्षे वयोगटातील तरूणीचा हा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृत तरूणीच्या उजव्या हातावर इंग्रजीत "ए" व आकाश असे लिहिले आहे. तसेच तिच्या अंगावर गुलाबी सलवार (टॉप) व फिकट गे्र रंगाचा लेगिन असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाला जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवले आहे. याघटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच विविध चर्चांना उत आला होता. तरूणीची हत्या की आत्महत्या या दिशेने पोलीस आता तपासकार्य करणार आहेत. सुट्यांमुळे वसतिगृह बंदव्हीएमव्हीतील मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी सद्यस्थितीत सुटीवर गेल्या आहेत. विविध शहरातील यामुली आपापल्या घरी गेल्यामुळे वसतिगृह बंद आहे. या विद्यार्थिनी आपआपल्या घरी पोहोचल्या आहेत किंवा नाहीत, याची माहिती गाडगेनगर पोलीस काढत आहे. त्यासाठी मुलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्या जात आहे. वसतिगृहातील मुलगी बेपत्ता आढळल्यास तशी कारवाई केली जाईल.तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशयतरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आल्यावर तो काही प्रमाणात कुजलेला होता. तीन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यु झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. सभागृहामागील भकास परसिरात दाट झुडुपे वाढल्यामुळे तेथे कोणी जात नाही. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. अशा ठिकाणी मृतदेह आढळणे, ही बाब घातपाताकडे दिशानिर्देश करणारी आहे.