शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 19, 2016 23:58 IST

हप्तेखोर पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर काळीपिवळी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दर्यापूर येथील प्रकार : हप्ता न दिल्याने काळी-पिवळी जप्त केल्याचा तरूणाचा आरोपअमरावती : हप्तेखोर पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर काळीपिवळी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दर्यापूर पोलिसांची ही गुंडगिरी शुक्रवारी उघडकीस आली. संतोष गंगाधर टोळे (२५,रा.दर्यापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या काळी-पिवळी चालकाचे नाव असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतोष हा दर्यापूर-अकोट मार्गावर स्वत:च्या मालकीची काळी-पिवळी चालवितो. प्रवासी वाहतुकीचा परवाना असूनदेखील त्याला दर्यापूर पोलिसांकडून हप्ता मागितला जात असल्याचा आरोप संतोषने केला आहे. प्रवासी वाहतुकीकरिता दर्यापूर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संतोषला १ हजार ५०० रूपयांचा हप्ता मागितला. गुरूवारी संतोष हा दर्यापूरहून अकोटला जाण्याकरिता प्रवाशांच्या प्रतीक्षेत होता. त्याच दरम्यान त्याच्याजवळ वाहतूक शाखेचे दोन पोलीस आले आणि त्यांनी हप्त्याची रक्कम मागितली. त्यावेळी पैसे नसल्याने अकोटहून परतल्यानंतर पैसे देतो, असे संतोषने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याचे काहीही ऐकून न घेता पोलिसांनी संतोषची काळी-पिवळी ताब्यात घेऊन ठाण्यात लावली. शुक्रवारी पैसे देतो, वाहन नेऊ नका, असे आर्जव त्याने पोलिसांना केले. संतोष मुलीच्या विवंचनेतअमरावती : परंतु पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवून संतोषला पट्ट्याने अमानुष मारहाण केली. शुक्रवारी सकाळी पुन्हा संतोष ८०० रुपये घेऊन दर्यापूर ठाण्यात पोहोचला. मात्र, दोन वाहतूक पोलिसांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेदम मारहाण केली, असा आरोेप संतोषने केला आहे. पोलीस ऐकत नसल्याचे पाहून संतोष मानसिक तणावात आला आणि त्याने विषारी औषधी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य बळवंत वानखडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ संतोषला नजीकच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. संतोषच्या दोन वर्षीय मुलीची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी तो पैशांची जुळवाजुळव करीत होता. उलट त्यालाच पोलिसांनी अमानुष मारहाण केली. संतोष टोळे हा दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेतले. मात्र, त्यानेच पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला मारहाण केली नाही. - नितीन गवारे, पोलीस निरीक्षक, दर्यापूर