शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक सुटली गोळी, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:16 IST

श्याम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आत गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांच्या उजव्या जांघेत गोळी लागल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देस्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खळबळ : जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्याम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आत गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांच्या उजव्या जांघेत गोळी लागल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता दरम्यान घडली.उज्ज्वल साहेबराव देशमुख (५२, रा. सातुर्णा, अमरावती) असे जखमीचे नाव आहे. शरद विठ्ठलराव महल्ले (५५, रा. सुसंयोग कॉलनी, कठोरा नाका) असे गोळी झाडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. घटना घडताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमीला झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. बँकेत सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटली आणि ती लागल्याने बँकेतील कऊंटर क्रमांक ११ व १२ च्या मागे उभे असलेले सफाई कर्मचारी उज्ज्वल देशमुख खाली कोसळले. त्यांच्या उजव्या जांघेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्याकारणाने बँकेत खळबळ उडाली. यावेळी बँकेत ५० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी व अनेक ग्राहक उपस्थित होते.रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या उज्ज्वल देशमुख यांना येथील अधिकारी-कर्मचाºयांनी तातडीने बँकेच्या वाहनातून उपचारासाठी खत्री कॉम्पलेक्सनजीक असलेल्या झेनिथ हॉस्पिटलमध्ये नेले. घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सिटी कोतवालीचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत असोलकर, सुहास शेंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.दरम्यान, उज्ज्वल देशमुख यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरातदेखील बघ्यांची गर्दी होती.१२ बोर पंप अ‍ॅक्शन गनमधून सुटली गोळीबँकेत दोन सुरक्षा रक्षक तैनात होते. यापैकी शरद महल्ले यांच्या बंदुकीतून गोळी सुटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. शरद महल्ले हे माजी सैनिक असून, त्यांनी १७ वर्षे मराठा रेजिमेंटमध्ये देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते २००१ पासून स्टेट बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याजवळ असलेल्या १२ बोर पंप अ‍ॅक्शन गनमधून गोळी सुटली आणि येथील सफाई कर्मचाºयाला लागली.अधिकाºयांसह, नागरिकही घाबरले४.३० वाजता बँकेची दारे बंद होतात. त्याच्या पंधरा मिनिटांपूर्वीच बंदुकीतून अचानक गोळी सुटली. ही घटना घडताच येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी व नागरिकही बंदुकीच्या आवाजाने घाबरले. काही वेळ नेमके काय झाले, हे कुणालाच कळले नाही. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले उज्वल देशमुख यांच्या दिशेने सर्वांनी धाव घेतली. काऊंटर क्रमांक १२ वर बँकेच्या सिनिअर असोसिएट संगीता कोल्हे व काऊंटर क्रमांक ११ वर ज्युनिअर असोसिएट प्रतीश अढावू काम करीत होते. अगदी त्यांच्या मागेच ही घटना घडल्याने तेसुद्धा भयभीत झाले होते. तातडीने जखमींना उचलण्यात आले.मी माझ्या केबिनमध्ये काम करीत असताना बंदुकीच्या फैरीचा आवाज आला. त्यामुळे तातडीने बाहेर आलो. पाहतो तर उज्ज्वल देशमुख जखमी अवस्थेत होते. त्यांना तातडीने बँकेच्या वाहनात उपचारासाठी दाखल करण्यात आले.- राजेंद्र मोहकरे, उपशाखा अधिकारी स्टेट बँक आॅफ इंडिया मुख्य शाखा श्याम चौक अमरावतीबँकेत इकडून तिकडे गस्त घालत होतो. एका ठिकाणी उभा राहिलो असता, हातातील बंदुकीतून ट्रिगर न दाबताच गोळी चालली. नेमके काय घडले, हे कळलेच नाही.- शरद महल्लेसुरक्षा रक्षक

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाAmravatiअमरावती