प्रसन्न दुचक्के - अमरावतीकर्तव्यावर असतांना दोन पोलीस उपनिरीक्षकांमध्ये क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी २.२० वाजता ही खळबळजनक घटना घडली. उपनिरीक्षकांचा शाब्दिक वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी दोन्ही उपनिरीक्षकांची समजूत घातल्याने हा वाद निवळला. उपनिरीक्षकांमध्ये झालेल्या या शाब्दिक वादामुळे पोलीस ठाण्यात एकूणच चर्चेला पेव फुटले होते. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दोन पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. यातील एक उपनिरीक्षक राज्य राखीव पोलीस दलातून बदलून आले आहेत.उपनिरीक्षक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहर कोतवाली पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. दोन उपनिरीक्षकांची पोलीस ठाण्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर शाब्दीक चकमक उडाली आहे. त्यामुळे ही चकमक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. तसे आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलीस उपनिरीक्षकांमध्ये शाब्दिक चकमक
By admin | Updated: August 17, 2014 22:53 IST