शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गौरखेडा येथे उपसरपंचाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

कळाशी येथे मोबाईल पळविला कळाशी : येथील गौरव मोहन गावंडे (२७) याचा नऊ हजारांचा मोबाईल त्याच्या घरातून लंपास झाला. ...

कळाशी येथे मोबाईल पळविला

कळाशी : येथील गौरव मोहन गावंडे (२७) याचा नऊ हजारांचा मोबाईल त्याच्या घरातून लंपास झाला. चुलतभाऊ मनोज अंबादास गावंडे यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून गावातील राजेश गजानन राणे याच्याविरुद्ध दर्यापूर पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यात आली. पोलिसांनी १ जून रोजी कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

------------

तोंडगाव येथे घरफोडी

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील तोंडगाव येथे शेख सत्तार गफ्फार (३०) यांच्या घराच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्याने १५ हजार रोख तसेच दागिने असा २७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ते २४ ते ३१ मे दरम्यान बाहेरगाव होते. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविचे कलम ४५४, ४६७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------

पैसे न दिल्याने पित्याला मारहाण

बेलोरा : चांदूर बाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील श्रीकृष्णनगर येथे राहुल विधाते (३८) याने पैसे देण्यास नकार देणाऱ्या पित्याला थापड-बुक्क्यांनी मारून भिंतीवर ढकलले. यात गणेश दौलतराव विधाते (७१) हे सेवानिवृत्त शिक्षक असलेले त्याचे वडील जखमी झाले. चांदूर बाजार पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

नांदुरी येथून मोबाईल पळविला

धारणी : तालुक्यातील नांदुरी येथील अंगणवाडी सेविका (४९) यांनी घरात खिडकीजवळ चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने पळविला. ३० मेच्या रात्री ही घटना घडली. धारणी पोलिसांनी भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------

एकीचा गर्भपात, दुसरीशी लग्न

चिखलदरा : लग्नाचे आमिष देऊन सहा वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या कमलेश गुलाब राऊत (रा. तेलखार) याने २५ वर्षीय युवतीचा गर्भपात केल्यानंतर तिला टाळाटाळ केली व अन्य युवतीशी लग्न केले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी १ जून रोजी भादंविचे कलम ३७८ (२) (एन) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

---------------

अज्ञात वाहनाची धडक, युवक जखमी

दर्यापूर : खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळा खुर्द येथे राहणारे बाळू एकनाथ इंगोले (६०) यांच्या एमएच २७ टी ८०९१ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ३ मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी १ जून रोजी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

हिंगणी येथे अवैध रेतीची वाहतूक

दर्यापूर : तालुक्यातील हिंगणी येथील नदी-नाल्यांतून एक ब्रास रेती अवैधरीत्या वाहून नेणारा ट्रॅक्टर आढळून आला. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी रणजित महेंद्र चोरपगार (३३) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------------

हिरपूर येथे विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा

तळेगाव दशासर : नजीकच्या हिरपूर येथे ३० मे २०२१ रोजी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रोशन शंकर ठाकरे व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये तळेगाव दशासर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------

खेड येथे आईला काठीने मारहाण

मोर्शी : ६० वर्षीय वृद्ध आईला घराबाहेर काढून त्यावर ताबा करण्याच्या उद्देशाने तिला शिवीगाळ, मारहाण होत असल्याची तक्रार मोर्शी पोलिसांत १ जून रोजी दाखल झाली. मंगेश रामभाऊ कवरे (४०) याने त्याच्या आईला इंधनाच्या लाकडाने डोक्यावर मारले. मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------