शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक पाच हजार रूपयांची लाच घेताना जेरबंद

By admin | Updated: May 27, 2014 23:20 IST

चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच हजारांची लाच स्वीकारताना चांदूरबाजारचे पोलीस उपनिरीक्षक भागवत बिदसिंग पाटील यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक

चांदूरबाजार : चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच हजारांची लाच स्वीकारताना चांदूरबाजारचे पोलीस उपनिरीक्षक भागवत बिदसिंग पाटील यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता स्थानिक पंचायत समिती चौकात घडली. या प्रकरणात भागवत पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

विठ्ठल गुलाबराव कुचे व विजय महादेवराव घुरुले यांची घरे एकमेकांच्या शेजारीच आहेत. विजय घुरुले हे मुळचे नागपूरचे रहिवासी असून वीज वितरण कंपनीत ते चांदूरबाजार येथे कार्यरत आहेत. विठ्ठल कुचे यांनी विजय घुरुले यांच्याविरूद्ध चांदूरबाजार पोलिसात ३0 हजार रूपये चोरून नेल्याची तक्रार ६ एप्रिल २0१४ रोजी केली होती. हे प्रकरण चौकशीत ठेवून तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील यांच्याकडे होता. याप्रकरणात भागवत पाटील यांनी पाच हजार रूपयाची मागणी करुन मागणी पूर्ण न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी विजय घुरुले यांना दिली होती.

यासंदर्भाची तक्रार विजय घुरुले यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार मंगळवारी दुपारी अमरावती विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात विभागीय पोलीस अधिकारी (लाचलुचपत) उत्तम जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह पंचायत समिती परिसरात सापळा रचला. यात पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील हे पाच हजारांची लाच घेताना अडकले.

या प्रकरणात विठ्ठल कुचे यांनी विजय घुरुले यांना १५ हजार रूपये व्याजाने दिले होते. ते वसूल करण्यासाठी कुचे यांनी घुरुले यांच्याविरुद्ध चोरीच्या तक्रारीचे अस्त्र वापरण्याची बाब समोर आल्याचे उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले. या कारवाईत भागवत पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)