शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवाराचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:13 IST

शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपेकी एक असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या....

पदधिकाऱ्यांची उपस्थिती : दोन्ही तालुक्यातील अधिकारी उपस्थितदर्यापूर : शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपेकी एक असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या विकासात्मक कामांचा आढावा दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी बुधवारी घेतला. आढावा सभेला दर्यापूर- अंजनगाव तालुक्यातील महसूल, कृषी व इतर विभागाचे अधिकारी तसेच राजकीय पदधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती. येथील माहेश्वरी भवनात आढावा सभा घेण्यात आली. व्यासपीठावर तहसीलदार राहुल तायडे, अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी अरविंद गुडधे, तालुका कृ षी अधिकारी विनोद लंगोटे, अंजनगावाचे कृषी अधिकारी विवेक टेकाडे, जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चव्हाण पंचायत समितीचे सभापती गजानन देवतळे, उपसभापती राजू कराळे, अंजनगाव पंचायत समितीचे उपसभापती महेश खारोडे आदी उपस्थिती होेती. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी सभेचे आढावा घेतला. दर्यापूर तालुक्यात मागेल त्यांना शेततळेअंतर्गत १४४९ अर्ज प्राप्त झालेत. ११०० शेततळे पूर्ण करण्याचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे. यावेळी २०१६-१७ व २०१७-१८ च्या कामांचा आढावा घेण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील १६ व अंजनगाव तालुक्यातील १४ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राहुल तायडे यांनी केले. उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी उपस्थिांना मार्गदर्शन केले. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी व संबंधित विभागाचे दोन्ही तालुक्यांतील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)