अमरावती : पूर्व माध्यमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला आहे. यामुळे या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची आता कसोटी लागणार आहे. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चवथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जात असे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ती पाचवी (पूर्व माध्यमिक)तसेच आठवीच्या (पूर्व उच्चमाध्यमिक) विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवी व आठवीसाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप सारखेच असणार आहे. परीक्षेसाठी पहिला पेपर प्रथम भाषा व गणिताचा असणार आहे. प्रथम भाषेसाठी २५ प्रश्न विचारले जाणार आहेत व त्यासाठी ५० गुण तर गणित विषयाचे ५० प्रश्न असून यासाठी १०० गुण असणार आहेत. या दीडशे गुणांच्या पेपरसाठी दीड तास वेळ दिला जाणार आहे. दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषेच्या २५ प्रश्नांसाठी ५० तर बुद्धीमत्ता चाचणीचे ५० प्रश्न असून यात १०० गुण आहेत. या पेपरसाठी दीड तासाचा वेळ दिला जाईल. पाचवी व आठवीसाठीच्या परीक्षेत ३० टक्के सोपे, मध्यम स्वरुपाचे ४० टक्के तर कठीण स्वरुपाचे ३० टक्के प्रश्न असणार आहेत.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या उत्तरात चार पर्यायांपैकी अचूक असलेले दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक केले आहे. परीक्षेचे स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अभ्यासक्रम ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या वेबसाईटवर पाहता येईल. शिष्यववृत्तीच्या बदललेल्या प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमाच्या स्वरुपाचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांना .मार्गदर्शन केले जाईल. - एस.एम. पानझाडे, शिक्षणाधिकारीशिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे व प्रश्नपत्रिकेचे बदलते स्वरुप पाहता शासनाने संबंधित विषय शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. - राजेश सावरकर,मुख्याध्यापक
शिष्यवृत्ती परीक्षेत लागणार विद्यार्थ्यांची कसोटी
By admin | Updated: August 4, 2016 00:13 IST