शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेचे विद्यार्थी धडकले प्रकल्प कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 00:09 IST

इयत्ता ८ ते १० वी करीता शिक्षक नियुक्त करा, या प्रमुख मागणीसाठी नजीकच्या बिजुधावडी येथील पोस्ट बेसिक ...

शिक्षकच नाही : अनवाणी, उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी मांडली वेदना धारणी : इयत्ता ८ ते १० वी करीता शिक्षक नियुक्त करा, या प्रमुख मागणीसाठी नजीकच्या बिजुधावडी येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील ६० विद्यार्थी संततधार पावसात उपाशीपोटी अनवाणी पावलांनी धारणी आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडकले. यामुळे येथील आदिवासी विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षकच नसल्याने येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थानांतरण होत असल्याच्या बाबीवरही यामुळे एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. जवळपास ५०० विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. मात्र, यावर्षी माध्यमिक शाळेत शिक्षकच नही. विद्यार्थ्यांनी अनेकदा याबाबत मुख्याध्यापकांना तक्रारी दिल्यात. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. वर्ग ८ ते १० या ३ वर्गांसाठी केवळ २ विषयांसाठी शिक्षक आहेत. इतर ७ विषयांसाठी, शिक्षकच नसल्याने मागील दीड महिन्यांपासून विद्यार्थी शाळा प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहेत.अखेरीस बुधवारी सकाळी ८ वाजता ८ वी ते १० वीची ६० मुले पायीच बिजुधावडी येथून धारणीला प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निघाली. सकाळपासून मूसळधार पाऊस पडत होता. परंतु त्याची पर्वा न करता विद्यार्थी छत्री व रेनकोट नसतानाही पायी निघाले. ५ तासांचा प्रवास करीत त्यांनी प्रकल्प कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी षणमुगराजन यांची भेट घेतली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना २ दिवसांत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. मेळघाटातील शिक्षणाची अशी दुर्दशा असल्यामुळेच येथील आदिवासी विद्यार्थी स्थानांतरण करीत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. नंतर त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन तत्काळ शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली.