शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

'सीएस'वर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: March 27, 2015 00:03 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी परिचारिकांशी असभ्य भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता ..

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी परिचारिकांशी असभ्य भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी चौकशी समितीने आरोग्य उपसंचालकांकडे कारवाईची शिफारस केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याविरुद्ध असभ्य भाषेची तक्रार अधिसेविकेसह काही परिचारिकांनी राज्य महिला आयोग सदस्य आशा मिरगे यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालय व राज्य महिला आयोगाने संयुक्तरीत्या निर्णय देऊन चौकशी समिती नेमली होती. यामध्ये राज्य महिला आयोग सदस्य आशा मिरगे, अकोला येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरवाळे, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, राज्य कर्मचारी संघटना सरचिटणीस डी.एस.पवार व नर्सिंग संघटना अध्यक्ष वर्षा पागोटे यांचा सहभाग होता. १६ फेब्रुवारीच्या चौकशीत समितीने परिचारिका व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. त्यानुसार अहवाल तयार करून सोमवारी मुंबई येथील आरोग्य संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. राऊत यांचा पूर्वीचा कार्यकाळ बघता ते 'सीएस'पदासाठी सक्षम नाहीत, त्यामुळे त्यांना आस्थापनातील त्याच श्रेणीतील दुसरे पद देण्यात यावे, असभ्य भाषा सुधारण्याचा समज द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)