शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चार खासगी रुग्णालयांवर कडक कारवाईची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST

अमरावती : खासगी रुग्णांलयाद्वारा कोविड, नॉनकोविड रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हा पथकाने शनिवारी चार खासगी रुग्णालयांना अचानक भेट दिली ...

अमरावती : खासगी रुग्णांलयाद्वारा कोविड, नॉनकोविड रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हा पथकाने शनिवारी चार खासगी रुग्णालयांना अचानक भेट दिली असता, अवास्तव बिलांच्या आकारणीसह अनेक नियमबाह्य प्रकार पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाद्वारा महापालिका आयुक्तांना शनिवारी अहवाल सादर करून कडक कारवाईची शिफारस करण्यात आली.

कोविड, नॉनकोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी व चाचण्यांकरिता शासनाद्वारा दर निश्चित केले आहे. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी करणे अनिवार्य आहे. या दर पत्रकांनुसारच आकारणी होते की, कसे याबाबतची तपासणी करण्याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वरा ९ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा पथक गठन करण्यात आले. या पथकाद्वारा ‘एमजेपीजेएवाय व पीएमजेएवाय’ योजनेचे काम देखील पाहण्यात येते.

या पथकात उपजिल्हाधिकारी राम लंके, लेखाधिकारी नरेंद्र भटूरकर, जिल्हा समन्वयक सचिन सानप, सहायक विलास घाटे, नितीन पडकुले, राजेश शर्मा यांचा समावेश आहे. शनिवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पथकाद्वारा चार खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या देयकांची नमुना तपासणी अचानक करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी, रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी व नियमबाह्य कारभार असल्याचे उघडकीस आले. हा अहवाल महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना शनिवारी सादर करण्यात येऊन कारवाईची शिफारस करण्यात आल्याने आयुक्त कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बॉक्स

हिलटॉप हॉस्पिटल

शासन दरपत्रकाप्रमाणे सिझेरीयन सेक्शन या शस्त्रक्रियेसाठी ५३ हजार प्रतिशस्त्रक्रिया व उपचारासाठी एकरकमी दर निर्धारित केलेले आहे. मात्र, देयक क्र, १४ मध्ये ८६,६०० प्रतिदिवस ४ हजारांऐवजी ६ दिवसांसाठी २४ हजारांची आकारणी करण्यात आली व दर्शनी भागात शासकीय दरपत्रक लावलेले नाही.

बॉक्स

अंबादेवी कोविड हॉस्पिटल

पीपीई कीट व औषधांचे खोके जाळून नष्ट करतानाचे दिसून आले. याशिवाय बिलिंग सेक्शन हा उपचार करण्यात येत असलेल्या वार्डातच कार्यन्वित असल्याचे पथकाला दिसून आले व रुग्णांचे नातेवाईक यांना जनरल वार्डात पाणी व इतर साहित्य देण्यासाठी थेट प्रवेश असल्याचे आढळले.

बॉक्स

रेनबो हॉस्पिटल

पीपीई कीट दराचा उल्लेख नसलेले जुने जोडपत्र लावलेले पथकाला दिसून आले. रुग्णांकडून ईसीजी, इन्फूजन, इट्युबेशनकरिता अतिरिक्त दराची आकारणी, काही रुग्णांना आयसीमधून प्रकृती ठिक झाल्यावर आयसोलेशन वाॅर्डात दाखल केल्यानंतरही त्या दिवसांचे सरसकट आयसीयूची आकारणी करण्यात आली.

बॉक्स

सिटी मल्टिस्पेशािलिटी हॉस्पिटल

वारंवार मागणी करूनही पथकाला बिलबुक दिले नाही. तासाभरानंतर एक बिलबुक दिले. त्यातील २२ पावत्या काढून पुरावा नष्ट केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सायंकाळी पथक सदस्यांच्या भ्रमनध्वनीवर कॉल करून सर्व देयकांच्या प्रिंटआऊट तयार असल्याचे सांगण्यात आल्याचे पथकाच्या अहवालात नमूद आहे.