शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तणाव : कंपोस्ट डेपोची जागा ताब्यात

By admin | Updated: January 28, 2015 23:06 IST

महापालिकेच्या सुकळी येथील कचरा डेपोसाठी अधिग्रहीत १८.४४ हेक्टर आर. जमिनीचा ताबा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी घेतला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच आकांडतांडाव केला.

प्रकल्पग्रस्तांचा आकांडतांडव : महिलांचा आक्रोश, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कारवाई अमरावती : महापालिकेच्या सुकळी येथील कचरा डेपोसाठी अधिग्रहीत १८.४४ हेक्टर आर. जमिनीचा ताबा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी घेतला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच आकांडतांडाव केला. मात्र, पोलिसांचा फौजफाटा प्रचंड असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या कडव्या विरोधानंतरही जागा अधिग्रहण झाले. दरम्यान प्रकल्पग्रस्त कुटूंबातील काही महिलांनी जीवघेणा आक्रोश करुन प्रशासनाच्या कार्यप्रणालीबद्दल रोष व्यक्त केला.कचरा डेपोत तुंबलेल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प साकारण्यासाठी महापालिकेने मुंबई येथील ‘ईको फिल’ या कंपनीशी करार केला आहे. खतनिर्मितीसाठी कचरा डेपो परिसरातच प्रशासनाने १८.४४ हेक्टर आर. जमिनीचे संपादन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुकळी परिसरातील जमीन अधिग्रहित करण्याची कार्यवाही महापालिकेने केली. आठ शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूल्य २ कोटी ४२ लाख रुपये ठरविले गेले. ही रक्कम महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा सुद्धा केली आहे. मात्र, आठ पैकी सात शेतकऱ्यांचा जमीन देण्यास नकार आहे. दामोदर जाधव नामक शेतकऱ्याने ६.२९ हेक्टर जमिनीचा ताबा देऊन प्रशासनाने ठरवून दिलेला मोबदला घेतला आहे. उर्वरित सात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कचरा डेपोसाठी जमीन न देण्याचा पवित्रा घेऊन प्रशासनाविरुद्ध लढा कायम ठेवला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काही प्रकल्पग्रस्तांनी धाव घेतली. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर प्रशासनाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही जोरात सुरु केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने १ फेब्रुवारी २०१३ रोजी महापालिकेला या जमिनीचा ताबा घेण्याबाबत निर्णय घेतला. महापालिकेचे जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे यांच्या नावे जमिनीचा ताबा घेण्याबाबतचे आदेश काढले होते. अखेर वर्षभरानंतर महापालिकेने ही जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.