शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

अमरावती जिल्ह्यात वादळाचा पुन्हा तडाखा

By admin | Updated: April 13, 2015 01:31 IST

जिल्ह्यात वादळाचा जोर सुरुच असून रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील

झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड : घरावरील टिनपत्रे उडाली, गावांमध्ये काळोखअमरावती : जिल्ह्यात वादळाचा जोर सुरुच असून रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरात सोसाट्याचे वादळ सुटल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. वादळामुळे काही घरांवरील टिनपत्रे उडाली असून सुमारे १० गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.रविवारी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वादळाचे आगमन झाले. पिंपळगाव निपाणी, लोहगाव, शिवरा, सालोड, लोणी टाकळी, दाभा, काजना, राजना, कोहळाजटेश्वर या गावांत वादळाचे थैमान सुरुच होते. वादळामुळे संत्रा, गहू, भाजीपाला व आंब्याचे मोठे नुकसान झाले. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावात काळोख पसरला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळामुळे काही गावांतील दुकानांवरील टिनपत्रे उडाल्याने व्यावसायीकांचे नुकसान झाले. काहींनी रस्त्यावर वाहने उभी केली असता वादळाच्या जोरात वाहने पडलीत. सायंकाळपर्यंत विजांचा कडकडाट सुरुच होता. वादळामुळे पाडाचे आंबे खाली पडल्यामुले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरात जवळपास एकतास पाऊस बरसला. नांदगाव येथे ६ वाजता बऱ्याच घरावरील टिनपत्रे उडाली. यात अरुण शिंदे, गोपाल मासोदकर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.दर्यापूर तालुक्यात गारपीटतालुक्यात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळाचे आगमण झाले. धामक येथे हरभऱ्याच्या आकाराची गारदेखील पडली. वादळामुळे रस्त्यावरील मोठमोठी वृक्ष धाराशाही झाली. येवदा येथेही काहीवेळ पावसाच्या सरी बरसल्या. सध्या रबी हंंगामाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात आले असून पुढील खरिप हंगामासाठी शेतीची मशागत सुरु आहे. रविवारच्या पावसामुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)