शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या मुद्यावर स्थायीच्या सभेत वादळ

By admin | Updated: August 27, 2016 00:06 IST

पंतप्रधान आवास योजनेत शासकीय घरकुलापासून जिल्हाभरात अनेक गोरगरीब लाभार्थी वंचित आहेत.

जिल्हा परिषद : वंचितांची नावे होणार समाविष्टअमरावती : पंतप्रधान आवास योजनेत शासकीय घरकुलापासून जिल्हाभरात अनेक गोरगरीब लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे अशा वंचित घटकांतील लाभार्थ्यांना घरकूल योजनेच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, असा मुद्दा शुक्रवारी जि.प. स्थायी समितीत सदस्य रवींद्र मुंदे यांनी लावून धरल्याने या विषयावर वादळी चर्चा झाली पंतप्रधान आवास योजनेत घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामसभेत वाचून दाखविलेत. परंतु अनेक गावात घरकुलासाठी पात्र असलेल्या गोरगरिबांची नावे नाहीत. श्रीमंतांची नावे असल्याचे दिसून आले. असे असताना झोपडीत राहणारे अनेक गरजवंत लाभार्थ्यांची नावेच यादीत नसल्याने शासनाने १५ आॅगस्टनिमित्त झालेल्या ग्रामसभेत वंचित असलेल्याची नावे समाविष्ट करावी व अपात्र असलेली नावे वगळण्याची सूचना केली होती. परंतु काही नागरिक ग्रामसभांना हजर नसल्यास व इतर कारणाहून येऊ न शकल्याने वंचित असलेल्या प्रत्येक गावातील वंचित लाभार्थ्याचे नावे घरकूल यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याची मागणी मुंदे यांनी केली. दरम्यान ग्रामसभेत मंजूर केलेल्या वंचित आणि वगळलेल्या नावांची यादी ग्रा.पं.मार्फत तालुका समितीकडे प्राप्त झाल्यानंतर ही यादी जिल्हास्तरीय समिती याला मंजुरी देते. तरीही वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी नावे. ग्रा.पं. कडे देऊन ही नावे तालुकास्तरीय समितीकडे सादर केल्यास अशा लाभार्थ्याची पडताळणी करून नावे यादीत समाविष्ट केले जातील असे प्रकल्प संचालक यांनी सांगितले. सभेला अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सुधीर सूर्यवंशी प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)साहित्य, औषध खरेदीस मान्यताजिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाने सन २०१६-१७ या वर्षाकरिता डीपीसी व विकास मंडळाकडून गैरआदिवासी भागातील प्रा.आ. केंद्रांना औषधी व साहित्य खरेदी ५० लक्ष रूपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. याशिवाय समाजकल्याण विभागामार्फत २० टक्के जिल्हा निधीतून डिझेलपंप व पाणबुडी तसेच शिलाई मशिन साहित्याची खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.