शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघाच्या नामनिर्देशनाला प्रारंभ

By admin | Updated: May 27, 2014 00:21 IST

अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार २७ मे पासून सुरू होणार

पत्रपरिषद : विभागीय आयुक्तांची माहिती

अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार २७ मे पासून सुरू होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना बनसोड म्हणाले की, शिक्षक मतदारसंघासाठी ३ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. ४ जून रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून ६ जून रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. २0 जून रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथे २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांतील ४४ हजार ७८८ एवढय़ा मतदारांची आतापर्यंत मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरु राहणार असून ९ मतदारांनी आपली मतदार नोंदणी संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म नं.१९ भरुन करावी, असे आवाहन बनसोड यांनी केले. शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ७१ मतदान केंद्र कार्यान्वित केले असून प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र देण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदार व मुख्यालय असल्यामुळे येथे मतदान केंद्राची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. १ नोव्हेंबर २0१३ रोजी शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मय्यत व सेवानवृत्तांची नावे विशेष मोहिमेंतर्गत वगळण्यात आली आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. पसंती क्रमानुसार मतदारांना मतदान करावे लागणार आहे.

निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह क्रमांक २ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाईल. या पत्रासोबत सामान्य प्रवर्गासाठी १0 हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमातीसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यात सात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात असल्याचेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला सहायक निवडणूक अधिकारी माधव चिमाजी, तहसीलदार वैशाली पाथरे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)