शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीला डावलून 'डिफॉल्टर' कंपनीला कंत्राट!

By admin | Updated: March 20, 2016 00:14 IST

'डिफॉल्टर' कंपनीला झुकतेमाप का, असा सवाल करत मालमत्तेच्या जीआयएस प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीच्या सादरीकरणावर शुक्रवारी पालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले.

महापालिकेत रणकंदण : आयुक्तांनी दर्शविली चर्चेची तयारीअमरावती : 'डिफॉल्टर' कंपनीला झुकतेमाप का, असा सवाल करत मालमत्तेच्या जीआयएस प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीच्या सादरीकरणावर शुक्रवारी पालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. काम अर्धवट सोडल्याने तत्कालीन आयुक्तांनी ‘सायबरटेक’ या कंपनीची देयके थांबविली होती. त्याच कंपनीला पुन्हा काम देऊन जीआयएस मॅपिंग न झाल्यास जबाबदारी कुणाची, असा सवाल विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, तुषार भारतीय, कुसूम साहू, प्रकाश बन्सोड यांनी उपस्थित केला. सन २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी या कंपनीसोबत १.४५ कोटी रुपयांत मालमत्तेचे जीआयएस मॅपिंगबद्दल करार केला होता. मात्र या कंपनीने वेळेत काम न केल्याने त्यांची देयके रोखली गेली. असे असताना स्थायी समितीची मंजुरी न घेता त्याच कंपनीला सादरीकरणासाठी बोलावण्याचे प्रयोजन काय? या कंपनीने यापूर्वी कुठल्या पालिकेत या प्रकारचे काम केले आहे? याची माहिती स्थायी समितीने मागितल्यावरही देण्यात आली नाही व परस्परच हा प्रस्ताव आज अवलोकनार्थ देण्यात आला. यावर मार्डीकर यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. करारातील अनेक मुद्दे पूर्ण न केल्याने या कंपनीवर फौजदारीच हवी होती, असे भूषण बन्सोड म्हणाले. या कंपनीचे अनुभवाचे पत्र स्थायीसह आमसभेसमोर ठेवा आणि जबाबदारी तुम्ही घ्या, असे अनेक नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले. त्यावर आपण चर्चा करण्यास तयार असून काम पूर्ण झाल्यावरच सदर कंपनीला उर्वरित रक्कम देऊ, असे भूमिका गुडेवार यांनी मांडली. आयुक्तांच्या भूमिकेनंतर हा मुद्दा शांत झाला. मालमत्ता कर प्रणालीच्या आॅनलाईन फिडिंगला कुणाचाही विरोध नाही. मात्र कुठलाही अनुभव न पाहता, अमरावतीतीलच काम अर्धवट करणाऱ्या या कंपनीला पुन्हा काम का, असा नगरसेवकांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)व्यावसायिकाला मारहाण : कारवाई करूपंधरवड्यापूर्वी बालाजी ट्रस्टमधील एका व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, विलास इंगोले आदींनी सभागृहात मत मांडले. दंड वसुली करतेवेळी सक्ती करू नये, ते सन्माननीय व्यावसायिकच आहेत, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यावर उपायुक्तांचा अहवाल आल्यावर दोषींवर निश्चितपणे कारवाई करू, असे आश्वासन पीठासीन सभापतींनी दिले. विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची चौकशीबडनेऱ्याच्या सोमवार बाजार परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाची चौकशी होणार आहे. कांचन ग्रेसपुंजे यांनी हा मुद्दा शुक्रवारी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे नगर रचना विभागाकडे या मंदिरोबाबत कुठलाही दस्तऐवज वा माहिती उपलब्ध नसल्याचे नगर रचना सहायक संचालक सु. ना. कांबळे यांनी सांगितले. यावर अतिक्रमण असल्यास कारवाई करू. तेथील सहायक आयुक्तांना सुनावणी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.अवर्गीकरणाचा ठराव मागेशहराच्या मध्यामधून जाणारा अमरावती-जयस्तंभ बडनेरा या राष्ट्रीय महामार्गाचे अवर्गीकरण करण्याबाबत ठराव आयुक्तांकडून मागे घेण्यात आला. चेतन पवार, प्रकाश बन्सोड, विलास इंगोले, विजय नागपुरे यांनी या चर्चेत भाग घेतला. निधी मंजूर झालेला हा रस्ता पालिकेने ताब्यात घेतल्यास अडचणी निर्माण होतील. निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत व्यक्त करण्यात आले. शेखावतांकडून आत्मस्तुतीविधी समिती व वृक्ष प्राधिकरण समितीवर पुन्हा काँग्रेसी नगरसेवक अरुण जयस्वाल यांची वर्णी लागली. त्यावर त्यांनाच ठेवायचे होते तर राजीनाम्याची गरज काय, असा प्रश्न भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी उपस्थित केला. त्यावर काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत उसळले व त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकाऊ नका. पालिकेत सर्व गट फुटले. ही माझ्या नेतृत्वाची कमाल आहे, असे सांगत शेखावतांनी आत्मस्तुती केली.