शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार स्थायीचे सभापती

By admin | Updated: March 17, 2017 00:07 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शुक्रवार १७ मार्चला निवडणूक प्रक्रिया होत आहे.

भारतीयकडे जबाबदारी : भाजपकडे ९ चे संख्याबळ अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शुक्रवार १७ मार्चला निवडणूक प्रक्रिया होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही निवडणूक होईल. ४५ सदस्यीय भाजपने यापूर्वीच स्थायी समितीचे सभापती म्हणून तुषार भारतीय यांचे नाव घोषित केल्याने शुक्रवारी केवळ औपचारिकता पार पडेल. मनपाच्या १६ सदस्यीय स्थायी समिती सभागृहात भाजपच्या गटाचे ९ सदस्य असल्याने तुषार पंडितराव भारतीय यांची निवड होणे निश्चित आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या तीन सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपने स्वाभिमानच्या सपना ठाकूर यांना स्थायी समिती सदस्य म्हणून पाठविले आहे. याखेरीज भाजपचे आठ सदस्य असल्याने सभापतीपदाच्या निवडीसाठी आवश्यक ९ चे संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे इतर कुणी निवडणूक रिंगणात नसल्यास तुषार भारतीय यांची स्थायी सभापती म्हणून निवड अविरोधही होऊ शकते. शुक्रवारी सकाळी ९.३० ते १०.३० दरम्यान सभापतीपदासाठी नामांकन, नामांकन माघारही याच कालावधीत घेण्यात येईल. भारतीय यांचे एकमेव नामांकन आल्यास ही निवडणूक अविरोध होईल. स्थायीच्या १६ सदस्यांची घोषणा ९ मार्चच्या विशेष सभेत करण्यात आली होती. (प्रतिनिधी)