शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

-आता घातक अन्नपदार्थ शोधण्यासाठी खास पथक

By admin | Updated: December 5, 2015 00:13 IST

अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे भेसळीचे दुष्परिणाम पाहता यापुढील काळात अन्न व औषधी प्रशासन विभाग ‘एफडीए’ असुरक्षित अन्नपदार्थांचा शोध ...

आयुक्तांचे नियंत्रण : कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अमरावती : अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे भेसळीचे दुष्परिणाम पाहता यापुढील काळात अन्न व औषधी प्रशासन विभाग ‘एफडीए’ असुरक्षित अन्नपदार्थांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. अन्नसुरक्षा व मानदे अधिनयम २००६ व नियम २०११ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे. हे पथक वेगवेगळ्या सहा स्तरांवर काम करणार आहे. ग्राहकांच्या रोजच्या जीवनाशी निगडित दूध, खाद्यतेल, मसाले, हॉटेल आयातीत अन्नपदार्थ आदी सुरक्षित उपलब्ध होण्यासाठी कारवाईची रुपरेषा आखून ती सादर करण्यासोबतच अन्नपदार्थात शरीरास अपायकारक घटक पदार्थांचावापर करणाऱ्या उत्पादकांचा शोध घेऊन अशा कंपन्यांची यादी पुढील कारवाईकरिता पुढे पाठविण्याची जबाबदारी या विशेष पथकावर आहे. विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात असुरक्षित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण याचा वेळोवेळी शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत. विशेष पथकाच्या मुख्य नियंत्रकाची जबाबदारी अन्नसुरक्षा आयुक्त, अन्न व औषधी प्रशासनाकडे देण्यात आली असून मुख्य समन्वयक म्हणून कोकण विभागाचे अन्न सहआयुक्त सु.स. देशमुख हे काम पाहतील. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाला कारवाईचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे पाठवायचा आहे. (प्रतिनिधी)