शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण, अंधश्रद्धा निर्मूलनासह पारदर्शी कारभारावर विशेष भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आला होता. तोच कित्ता मेळघाटात कुषोषण निर्मूलनासाठी विशेष मोहिमेव्दारे राबविण्यास आपली प्राथमिकता असेल. पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर राहणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी येथे दिली. 

ठळक मुद्देनव्या जिल्हाधिकाऱ्यांचा अजेंडा, पवनीत कौर यांनी पदभार स्वीकारला, पालघरचे जिल्हाधिकारी पद यशस्वीपणे भूषविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सुविधा उपलब्धता करून देत असतानाच तेथील स्थानिकांनी इतर अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आला होता. तोच कित्ता मेळघाटात कुषोषण निर्मूलनासाठी विशेष मोहिमेव्दारे राबविण्यास आपली प्राथमिकता असेल. पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर राहणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी येथे दिली. अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पदभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून १५ जुलै रोजी स्वीकारला. पवनित कौर या मूळ पंजाबमधील आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१४ मध्ये आयएएस सेवेत निवड झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात जव्हार येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त, महिला व बालविकास आयुक्त म्हणूनही काम पाहिले. अमरावती येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. जिल्ह्यात पांदण रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गती दिली. हा कार्यक्रम यापुढेही भरीवपणे राबविणार. जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्यांबाबत निर्णय व अंमलबजावणीसाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागप्रमुख आदींच्या बैठका घेण्यात येतील. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी पुढील आठवड्यात भेटी देऊ, असेही नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण मोहीम सुरळीत राबविणारकोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. विशेषकरून, लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहिमेत खंड पडू नये, यासाठी दक्षतापूर्वक नियोजन करण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील पुनर्वसनाबाबतचे प्रश्न व अडचणी सोडविण्यावरही प्राधान्याने भर देणार असल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.

कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मोहीममेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सुविधा उपलब्धता करून देत असतानाच तेथील स्थानिकांनी इतर अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी