भूखंड चोरी प्रकरण : दोघांच्या भूखंडातून रस्त्याची आखणीप्रदीप भाकरे अमरावतीशासकीय जागेवर मुळात रस्ता अस्तित्वात असताना त्याच रस्त्यासाठी नव्याने जागा देण्यासाठीचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न चोरी गेलेल्या भूखंड प्रकरणासंबंधी बीएसएनएलने उपस्थित केला आहे. प्राप्त माहितीनुसार, सप्टेंबर २०१५ मध्ये अमरावती तहसीलदारांनी बीएसएनएलच्या मंजूर जागेतून ०.२० आर आणि राणा एज्युकेशन सोसायटीच्या जागेतून ०.३० हेक्टर आर जागेमधून १२ मीटर रुंद रस्ता जात असल्याने ०.५० हे. आर जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, या अटीवर राणा एज्युकेशन सोसायटीला त्यांना मंजूर झालेल्या जागेचा ताबा देण्यासंदर्भात पत्र काढले. ज्यावेळी बीएसएनएलकडे ०.८१ आर जागा हस्तांतरित करण्यात आली, त्यावेळी रस्त्याची जागा अस्तित्वात होती. पूर्वी रस्ता नगररचनामध्ये असताना आता दोघांच्या प्लॉटमधून जागा घेऊन रस्त्याची केली जात असलेली उठाठेव बीएसएनएलला आक्षेपार्ह वाटते. यासंदर्भात बीएसएनएलच्या अधिकारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह या भागाचे नगरसेवक तुषार भारतीय यांनीसुध्दा आक्षेप घेतला आहे. ०.३९ आर भूखंडाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अस्तित्वात असलेल्या रस्त्यासाठी पुन्हा जागा
By admin | Updated: October 25, 2015 00:06 IST