पूर्णानगर : खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी येथील कृषी केंद्राची चौकशी केली व येथून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. पूर्णानगर येथील यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले महाबीज कंपनीचे ३३५ जातींचे सोयाबीन व यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले 'सिध्द' या जातीचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची तक्रार भातकुुली पंचायत समिती कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी मस्के, महाबीजचे व्यवस्थापक देशमुख, पंंचायत समिती अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी पूर्णानगर येथील कृषी केंद्राची चौकशी केली. या केंद्रातून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी किशोर कामुने, कृषी विकास अधिकारी काठोडे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, मस्के, महाबीज मंडळाचे देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनोद जायलवाल, पूर्णानगरचे सरपंच सुधीर बोबडे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी कृषी केंद्र विक्रेता प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कृषी केंद्रांची सखोल चौकशी करून कारवाईचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कामुने यांनी नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतीची पाहणी करून पुनर्सर्वेक्षणाचे आदेश दिले. कृषी विभागाचा पाहणी अहवालपूर्णानगर येथील शेतकरी पवन श्रीराम दिनोदे यांचा पाहणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक्ष त्यांच्या शेताला भेट दिली असता बियाणे निघण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. तूर मात्र चांगली दिसून येत आहे. एक चौरस मीटर क्षेत्रातील सोेयाबीनची झाडे मोेजली असता त्याची सरासरी ४ रोपे दिसून येत आहे. यावरून उगवणीची टक्केवारी ४ टक्के दिसून येते, असे कृषी विभागाच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. शेतकरी ग्राहक मंचाकडे घेणार धावमहाबीज मंडळाचे ३३५ जातीचे सोयाबीन व सिध्द उत्पादक कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.य सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असल्याने बियाणेच बोगस निघल्याने शतकरी पुरता खचून गेला आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई, पेरणी खर्च, शेतकऱ्यांची फसवणूक, होणारा मानसिक त्रास यासंदर्भात शेतकरी वर्ग ग्राहकमंचाकडे धाव घेणार आहे.
सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारींची दखल
By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST