शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख हेक्टरमध्ये पेरणी

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

आठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

गजानन मोहोड अमरावतीआठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपाच्या हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर पेरणीक्षेत्राचे नियोजन आहे. पूर्वमान्सून व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्रात अद्याप एक टक्काही पेरणी झालेली नाही. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे किमान ६० ते ७० मि.मी. पाऊ स झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत एकूण ८८ मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.ं-तर भासेल ओलाव्याचा अभावअमरावती : मान्सूनच्या पावसाची एक दोन दिवस मागेपुढे सुरुवात होईल. परंतु नंतर पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पाऊस सरासरी पार करणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्याची पावसाची एकूण सरासरी १४६ मिमी असताना केवळ ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ही टक्केवारी केवळ ३४ होती. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी व बियाणे उगवण न झाल्याचे संकट ओढवले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाची एकूण सरासरी २७७ मि.मी.च्या तुलनेत ३८६ मि.मी. म्हणजेच १३९ टक्के पाऊस पडला होता. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास खरीप पिकांच्या योग्यवेळी पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलाव्याचा अभाव राहण्याची शक्यता आहे. कडधान्य पिकाची वेळेवर पेरणी करण्यास अडचणी संभवतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पहिल्याच पावसामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. वखर, फलटन, जांभूळवाहित, पट्टीपास आदी मिळेल त्या साधनाव्दारे तयारीला लागला आहे. बि-बियाणे खरेदीला वेग आला आहे. बीटी कपाशीची पाकीटावर १०० रुपये कमी करुन शासनाने शेतकऱ्याला अंशत: दिलासा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी दोन पीक विमा योजना सुरु केल्या आहेत. बोगस बियाण्यांचया शिरकाव होऊ नये यासाठी १५ भरारी पथके तैनात आहेत. कृषी विभागाच्या नियोजना नुसार यंदा सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र राहणार आहे. पाऊ स उशिरा आल्यास ६० दिवसांचे पीक असणारे मूग व उडीद पेरणीचे प्रमाण कमी होऊन सोयाबीन व कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.