शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात खरिपाची २९.२५ लाख हेक्टरमध्ये पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : विभागात ९ जुलैनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ३२,२८,५०० हेक्टर सरासरी ...

अमरावती : विभागात ९ जुलैनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ३२,२८,५०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २९,२५,४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. विभागातल्या चार जिल्ह्यात ९० टक्क्यांवर पेरणी झालेली असतांना पावसाअभावी अकोला जिल्ह्यात मात्र टक्का माघारल्याचे दिसून येते.

पश्चिम विदर्भात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सक्रिय नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, महिनाभरानंतर म्हणजेच ९ जुलैपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने खरिपाच्या पेरण्यांना गती आली. त्यापूर्वी १० ते १२ दिवस पावसात खंड पडल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्या पेरण्यादेखील आता आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यांनाही आता गती आल्याचे दिसून येते.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या गुरुवारच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात ६,४९,५०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ९४ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८,६८,२०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९५ टक्केवारी आहे. वाशिम जिल्ह्यात ३,७७,९०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९२ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६,६७,२०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९१ टक्केवारी आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात ३,६२,४०० हेक्टरमध्ये आतापर्यत पेरणी आटोपली. ही ७५ टक्केवारी आहे.

बॉक्स

सर्वाधिक १३.११ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

विभागात आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक १३,११,१०० हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ही ८६ टक्केवारी आहे. याशिवाय कपाशीची ९,१६,८०० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे. ही सरासरीच्या ९३ टक्के क्षेत्र आहे. कृषी विभागाच्या मते आता सोयाबीनचे नापेर क्षेत्र कपाशीच्या क्षेत्रात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

असे आहे पीकनिहाय क्षेत्र

विभागात सद्यस्थितीत ५,३०० हेक्टरमध्ये धान, २७,००० हेक्टरमध्ये ज्वारी, १०० हेक्टरमध्ये बाजरी, २५,५०० हेक्टरमध्ये मका, १,३०० हेक्टरमध्ये इतर तृणधान्य, ३,७९,१०० हेक्टरमध्ये तूर, ५५,९०० हेक्टरमध्ये मूग, ४२,४०० हेक्टरमध्ये उडीद, ६०० हेक्टरमध्ये भुईमूग, ९०० हेक्टरमध्ये तीळ, १०० हेक्टरमध्ये सुर्यफुलाची पेरणी झालेली आहे.