शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोफिया वीज प्रकल्पाकडील १७२ कोटींची थकबाकी वसूल करणार!

By admin | Updated: June 28, 2014 00:22 IST

जिल्ह्यातील इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया वीज प्रकल्पाकडील अप्पर वर्धा धरण विभागाची थकबाकी सुमारे १७२ कोटी रूपयांवर पोहचली आहे.

अमरावती : जिल्ह्यातील इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया वीज प्रकल्पाकडील अप्पर वर्धा धरण विभागाची थकबाकी सुमारे १७२ कोटी रूपयांवर पोहचली आहे. या कंपनीकडून पाणी करारानुसार पैसे देण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसत आहे. सोफिया वीज प्रकल्पाकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी अडकल्याने पाण्याच्या नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे पाणीपट्टी भरली नाही किंवा वीज बिल भरले नाही तर शेतकऱ्यांची विनाविलंब वीज कापण्यात येते. मात्र दुसरीकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीसाठी हेच शासन वेगळे धोरण ठेवते. आधीच सिंचनाचा अनुशेष असताना इंडिया बुल्स कंपनीबाबत सहानुभूतीचे धोरण कशासाठी? असा प्रतिप्रश्न यावेळी आ. रणजित पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात मांडून या गंभीर प्रकरणावर लक्ष वेधले. सदर थकबाकी तत्काळ वसूल करण्याकरिता शासनाने कठोर पावले उचलावी व योग्य कारवाई करावी, अशी सूचना सभागृहामध्ये केली आहे. आ. पाटील यांच्या या सूचनेवर राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सदर लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कंपनीकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे मान्य करून आश्वासन दिले की, प्रती हेक्टरी एक लाख रूपये पुनर्स्थापनेचा खर्च घेण्याबाबत सरकार ठाम असून कंपनीकडून व्याज व दंडनीय रक्कम निश्चितपणे वसूल करण्यात येईल आणि जर कंपनीकडून रक्कम भरताना हयगय झाली तर १०० टक्के करारनामा रद्द करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी सभागृहात दिले. (प्रतिनिधी)