शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांची होणार तपासणी

By admin | Updated: March 18, 2017 00:15 IST

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, नाशिक, दौड या भागात अनधिकृत डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये स्त्री भू्रणहत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

आरोग्य विभागाचे निर्देश : अकस्मात भेटी देणारअमरावती : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, नाशिक, दौड या भागात अनधिकृत डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये स्त्री भू्रणहत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील गर्भलिंग निदान चाचणीचे बिंग फुटले. पांढरपेशा व्यवसायाला आधार करून सुरू असलेल्या या गोरखधंद्याला वेसन घालण्यासाठी आता शहर, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवर चार जणांची टीम सर्व रुग्णालये आणि नर्सिंग होमची पडताळणी करणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तडकाफडकी दखल घेत राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी संयुक्त पथक तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. १७ मार्चपासून पथकाने कागदपत्रे पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक महापालिका स्तरावरील आरोगय अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत पोलीस आयुक्त, ग्रामीण जिल्हा पोलीस, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. तालुका स्तरावरील समितीत तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा पोलीस उपायुक्त, अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार नायब तहसीलदार यांचाही समावेश आहे. सांगलीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्र्यांनी गुरूवारी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून कायद्याच्या कठोर अंमलबजावणीत सूचना केल्या आहेत. त्यावेळी आरोग्य संचालक सतीश पवार, अर्चना पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. ही समिती शहर, जिल्हा आणि तालुका पातळीवर सर्व नोंदणीकृत दवाखाने, डॉक्टर्स, गर्भपात केंद्र, सोनोग्राफी केंद्रावर कुठलीही पूर्वसूचना न देता धडकणार आहेत. आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक कारवाई करून कागदपत्रे तपासणी करणार आहेत. या पथकामार्फत कारवाई एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर समिती त्यावर आवश्यक कारवाई करणार आहे. (प्रतिनिधी)