शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पुनर्वसित गावांच्या अडचणी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

बच्चू कडू : बालसंगोपन योजनांच्या प्रभावी अंमलबाजवणीचे निर्देश परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिक्षेत्रातून पिली, मांगिया, रोला, वन मारूल, ...

बच्चू कडू : बालसंगोपन योजनांच्या प्रभावी अंमलबाजवणीचे निर्देश

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिक्षेत्रातून पिली, मांगिया, रोला, वन मारूल, चुरणी आदी गावांचे चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु, पुनर्वसित गावांत नागरी सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. रस्ते, नाल्या, शाळा, समाज मंदीराचे बांधकामासंदर्भात तेथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वनविभागाने पुनर्वसित गावांच्या संदर्भात योग्य नियोजन करुन संबंधित गावकऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उभारण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत दिले.

अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, वनविभागाचे अधिकारी, तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागाने शबरी व ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ मिळवून द्यावा. कोरोना संकटकाळात आदिवासी मुलांचे शिक्षण खंडित पडले आहे, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बांधकाम पूर्ण होईपर्यंत तीन किलोमीटरच्या शाळेत शिक्षण घेता येईल, यासाठी आदिवासी विकास विभागाने व्यवस्था करावी. वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत पुनर्वसित गावात शिबिराचे आयोजन करून मतदान ओळखपत्र, जातीचे दाखले आदी कागदपत्रे गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, असेही निर्देश कडू यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

-------------------

बाल संगोपन योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित

विधवा महिला व त्यांच्या अवलंबित १९ वर्षाखालील मुलांना बाल संगोपन योजनेतून अकराशे रुपये सानुग्रह दिले जाते. याशिवाय मेळघाटसह चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील बाल संगोपन योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारस महिलांना व त्यांच्या बालकांना अद्यापपर्यंत विभागाद्वारे अनुदान योजनेचा लाभ मिळाला नाही. या कामात दिरगांई होता कामा नये, अशी तंबी ना. कडू यांनी दिली.