शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरी’च्या अहवालावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मदार

By admin | Updated: May 3, 2017 00:21 IST

महापालिकेचा बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चार महिन्यांपासून नगरविकास विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे.

प्रकल्प रखडला : संभ्रम कायम, प्रकल्पावर नकारात्मक चर्चा अमरावती : महापालिकेचा बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चार महिन्यांपासून नगरविकास विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे. आता नव्याने या प्रकल्पाची मदार नागपूरस्थित ‘नीरी’ या संस्थेच्या अहवालावर अवलंबून आहे. नीरी (नॅशनल एन्व्हायर्नमेंट इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)ने केलेल्या छाननीअंती या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे. मात्र नीरीने आकारलेले तपासणी शुल्कावरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान दोन महिने या प्रक्रियेला विराम मिळण्याची दुश्चिन्हे आहेत.ओव्हरफ्लो झालेल्या सुकळी कंम्पोस्ट डेपोमधील ७ ते ८ लाख टन कचऱ्यावरील प्रक्रियेसह शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या २०० ते २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर साकारण्यास महापालिकेने पुढाकार घेतला. त्यासाठी गतवर्षी निविदा प्रक्रिया राबविली. त्यातून ७.९९ कोटी रुपये खर्चून ४०० टन प्रतिदिवस क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविणाऱ्या आणि निविदा प्रक्रियेत ‘एल वन’ ठरलेल्या कोअर प्रोजेक्टची निवड करण्यात आली. तेवढीच रक्कम महापालिका खर्च करणार होती. तत्कालीन स्थायी समितीने त्या एजंसीशीला करारनामा करण्यास मान्यता दिली. मात्र २ डिसेंबर २०१६ ला तत्कालीन नगरसेवक राजू मसराम यांच्यासह अन्य काही नगरसेवकांनी या प्रकल्पाच्या करारनाम्यावर आक्षेप घेऊन नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली. तेथून हे प्रकरण नगरविकास विभागाकडे प्रलंबित राहिले. त्यात राजकारणाचाही शिरकाव झाला. आता नव्याने नीरी या संस्थेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करवून घेण्याची सूचना नगरविकास विभागाने केली आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करून छाननीबाबतचा करार "नीरी"शी केला आहे. डीपीआरच्या छाननीसाठी नीरीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अडीच लाख रुपये शुल्क घ्यावेत, असेही राज्य सरकार व नीरीत झालेल्या एमओयूमध्ये नमूद आहे.त्याबाबत अमरावती महापालिकेने आपण रक्कम भरण्यास तयार असल्याबाबत नीरीशी पत्रव्यवहारही केला. मात्र नीरीला अमरावती महापालिकेच्या ज्या प्रस्तावाची छाननी आणि तांत्रिक तपासणी करायची आहे तो डीपीआर नसून अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे शुल्क आकारायचे की कसे, असा प्रश्न नीरी या संस्थेला पडला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीपूर्वीच एक नवा पेच उभा ठाकला आहे. (प्रतिनिधी)प्रक्रियेवर आक्षेप ? अमरावती महापालिकेच्या प्रस्तावात त्रुट्या काढून तो प्रस्तावच नीरीने फेटाळल्याचे वृत्त आहे. मात्र महापालिका सूत्राकडून त्याची खातरजमा होऊ शकली नाही. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि संपूर्ण नियोजन पर्यावरण विभागाऐवजी स्वच्छता विभागाकडून व्हायला हवे होते, असा शेरा मंत्रालयातील उच्चपदस्थाने दिल्याची माहिती हाती आली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वच्छता विभागाशी संबंधित असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी आणि छाननी नीरीकडून होणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र शुल्कावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.- हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका