शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी जंगलात सौर ऊर्जेवरील हातपंप

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

वडाळी जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत.

पहिलाच प्रयोग : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी पाच लाखांचा खर्चअमरावती : वडाळी जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत. त्याकरिता पाच लाख रूपयांचा खर्च होणार असून वडाळी जंगलात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. परिणामी उन्हाळ्यात वन्यपशुंसमोर उद्भवणारा पाणीप्रश्न निकाली निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे.सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित असून या सौरपंपांमुळे वन्यपशुंंच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. वडाळी-पोहरा जंगलात बिबट, हरिण, रानडुक्कर, वाघ, चितळ, माकड आदी वन्यपशुंसह पक्ष्यांची संख्या अधिक आहे. मात्र, जंगलात जलस्त्रोत कमी प्रमाणात असल्यामुळे वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता जेमतेम उन्हाळा सुरू झाला असून जंगलातील पाणवठ्यांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे वडाळी जंगलातील भवानी तलाव परिसरात एक हातपंप आणि सोलरपंप बसविला जात आहे. या भागात वन्यपशुंची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे हे ठिकाण सोलरपंप बसविण्याकरिता निवडले गेले आहे. सोलरपंप स्वयंचलित असून सूर्यप्रकाश असेपर्यंतच हातपंपाद्वारे पाणी उपणे शक्य होणार आहे. वन्यपशुंसाठी नव्याने पाणवठे तयार करण्यात आली आहेत. सोलर पंपाद्वारे हातपंपातून पाणी पाणवठ्यात सोडण्याचीे व्यवस्था करण्यात आली आहे. सोलर ऊर्जेवरील हातपंपांसाठी वन्यजीव संरक्षणअंतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून पाच लाख रूपयांचा खर्च केला जाणार आहे. वडाळी जंगलात सोलर ऊर्जेच्या हातपंपाचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणी हा प्रयोग राबविला जाईल. यापूर्वी पोहरा-चिरोडी जंगलात हातपंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)स्वयंचलित असेल हातपंपहे सोलर ऊर्जेवरील हातपंप स्वयंचलित राहणार असून त्यानुसार वनविभागाने निविदा देखील काढल्या होत्या. नामांकित कंपनीचे सोलर पंप असून हातपंपांचा दर्जा उत्तम राहणार आहे. नव्या प्रयोगामुळे वनकर्मचाऱ्यांवरील ताण देखील कमी झाला आहे.एक सोलर सेट आणि हातपंप बसविले जाणार आहेत. त्याकरीता पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत.- नीनू सोमराज,उपवनसंरक्षक, अमरावती.