शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भूधारकांच्या संमतीवर ‘स्मार्ट सिटी’ची मदार

By admin | Updated: February 17, 2017 00:18 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची ‘डेडलाईन’ जवळ आली असताना

२७ फेब्रुवारीची ‘डेडलाईन’ : ११८ हेक्टर जमिनीची गरज अमरावती : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची ‘डेडलाईन’ जवळ आली असताना वडद येथिल शेतकऱ्यांनी त्यांची जमीन देण्यास अद्यापही संमती दिलेंली नाही. वडद येथिल शेतकऱ्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी त्यांची जमीन उपलब्ध करून देण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत लेखी संमती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे.महापालिकेतर्फे वडद येथिल ११८.८३ अर्थात २९७ एकर जमिनीवर स्मार्ट सिटी प्रकल्प विचाराधीन आहे. त्यासाठी संबंधित जमीनधारकांची संमती असल्याचे दस्तऐवज मिळाल्यानंतरच प्रस्तावाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अमरावती महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाचा टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे आता महापालिकेला ३१ मार्चपर्यंत नव्याने स्मार्ट सिटीच्या जागेसह केंद्रशासनाला सुधारित प्रस्ताव पाठवायचा आहे. मात्र, वडद येथिल शेतकऱ्यांनी महापालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट सिटीच्या सहभागावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या जागेबाबत महापालिकेत १७ जानेवारीला संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीदरम्यान स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या महत्त्वासह शेतकऱ्यांच्या वा त्या जमिनधारकांच्या लाभाबाबत उहापोह करण्यात आला. आयुक्त हेमंत पवार यांच्यासह उभय उपायुक्त आणि पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी त्यावेळी उपस्थित जमिनधारकांशी सकारात्मक संवाद साधला होता. महापालिकेतर्फे त्या जमिनधारकांना सुयोग्य प्रस्ताव देण्यात आला. एकूण जमिनीपैकी ३० टक्के जमिनी त्यांना ‘वेल डेव्हलप’ करुन दिली जाईल. ती जमीन संबंधित शेतकऱ्यांमध्ये समप्रमाणात वितरित करण्यात येईल, असा एकंदर प्रस्ताव होता. त्याअनुषंगाने जमिनधारकांनी त्यांची एक कृती समिती गठित करून महापालिकेला निर्णय कळवावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने ‘शेतकरी कृती समिती स्मार्ट सिटी मौजे वडद’ ची स्थापना केल्याचे ११ फेब्रुवारीला महापालिकेला कळविण्यात आले. मात्र, १७ जानेवारीच्या बैठकीनंतर महिना उलटत असताना संबंधित जमिनधारकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित जमिनधारकांना जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत नोटीस देण्याची कारवाई महापालिकास्तरावरुन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मौजे वडद येथिल सर्वे क्रमांकनिहाय जमीन मालकांची यादी जाहीर करण्यात आली असून स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत लेखी संमती २७ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेस सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.