शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

४५० एकर परिसरात ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: December 2, 2015 00:06 IST

शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर राज्याला हेवा वाटेल अशी स्मार्ट सिटी महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात साकारली जाणार आहे.

महादेव खोरी, छत्री तलाव जागा निश्चित : महापौर, आमदार, आयुक्तांनी केली जागेची पाहणीअमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर राज्याला हेवा वाटेल अशी स्मार्ट सिटी महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात साकारली जाणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी महापौर चरणजित कौर नंदा, आमदार रवी राणा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदींनी जागेची पाहणी करुन या निसर्गरम्य भागात ‘स्मार्ट सिटी’ उभारण्याबाबत एकमत दर्शविले. ही जागा महसूल विभागाची असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रश्नच राहणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.‘स्मार्ट सिटी’बाबतचा विकास आराखडा १५ डिसेंबरपर्यत शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारावी, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता महादेव खोरी व छत्रीतलाव परिसरात स्मार्ट सिटी साकारणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महादेव खोरी परिसरात गौरक्षण संस्थानची २५६ एकर तर छत्रीतलाव परिसरातील जागा अशा एकूण ४५० एकर जागेवर ‘स्मार्ट सिटी’ साकारणे शक्य आहे. महादेव खोरी, छत्रीतलाव परिसर निसर्गरम्य असून आंध्रप्रदेशातील अमरावती शहराप्रमाणे हे शहरसुध्दा ‘हायटेक’ होईल, असे आयुक्त गुडेवार म्हणाले. जागेची पाहणी केल्यानंतर महापौर चरणजित कौर नंदा यांच्या निवासस्थानी आ. रवी राणा, आयुक्त गुडेवार यांनी ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात चर्चा केली. ज्या भागाची पाहणी केली या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारणे सुकर असल्याचे सर्वांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांना जागेच्या पाहणीसाठी आणूमहादेव खोरी व छत्रीतलाव परिसर निसर्गरम्य असून या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारली जात असल्याची बाब शहरवासींयासाठी आनंददायी आहे. येथील बहुतांश जागा ‘ई- क्लास’ची आहे. त्यामुळे जागेचा गुंता सुटेल, यात शंका नाही, असे आ. रवी राणा म्हणाले. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या जागेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणू ,असा शब्द देखील आ. रवि राणा यांनी दिला. यामुळे आता स्मार्ट सिटी साकारण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे संकेत आहेत.