शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांवर मोक्का लावा

By admin | Updated: June 22, 2016 23:55 IST

महसूल अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी अवैध रेती व्यावसायिकांवर मोक्का (एमपीडीए) अंतर्गत कारवाई केली जाईल.

पालकमंत्र्यांचे आदेश : महसूल, पोलीस, आरटीओची समन्वय बैठकअमरावती : महसूल अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी अवैध रेती व्यावसायिकांवर मोक्का (एमपीडीए) अंतर्गत कारवाई केली जाईल. मात्र अधिकाऱ्यांनी कर्तव्याप्रती प्रामाणिक रहावे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी आयोजित महसूल, पोलीस व आरटीओच्या समन्वय बैठकीत निक्षून सांगितले.बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक, लखमी गौतम, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर उपस्थित होते. मागील वर्षापेक्षा यंदा अवैध रेती वाहतुकीच्या अधिक कारवाया झाल्या आहेत. एप्रिल २०१५ ते मे २०१६ या कालावधीत तब्बल १०१७ कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये ९६२ वाहनांवर कारवाई करून २ कोटी २५ लाख ५३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी शहरात अवैध रेतीचा साठा होऊ दिला नाही. त्यामुळे शासनाच्या महसूलात भर पडल्याचे त्यांनी सांगीतले. लिलावधारकांनी त्याच घाटातून रेती उचलली पाहिजे. ठराविक परिमाणापेक्षा अधिक रेतीची वाहतूक करू नये, एक मिटरपेक्षा अधिक उत्खनन करता येणार नाही व कुठल्याही यंत्राचा वापर करता येणार नाही, वाहन रेतीघाटातून निघण्यापूर्वी एसएमएस द्यायला हवा. वाहनांवर कारवाई होत असताना एसएमएस आल्यास तो खोटा असतो, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.- तर पाठविता येईल एमपीडीएसाठी प्रस्तावअवैध रेती वाहतूकदारावर दोन गुन्हे दाखल आहेत व तेही सहा महिन्यांच्या कालावधीतील असतील तर त्या व्यक्तिविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रकल्प पाठविता येतो, असे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले. महसूल विभागाला कधीही सरंक्षकाची गरज भासल्यास तासाभराच्या आत उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अशा झाल्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवायाजिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मे २०१६ या कालावधीत १०१७ अवैध वाळू वाहतुकीबाबत कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये ९६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २ कोटी २५ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक १४४, अचलपूर १२३, भातकुली ५७, तिवसा ४२, धामणगाव ७०, नांदगाव ४७, मोर्शी ६४, वरुड ८६, चांदूरबाजार ९९, दर्यापूर २४, अंजनगाव ९५, धारणी ४४ व चिखलदरा तालुक्यात ८ कारवाया करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकतेअवैध रेतीवाहतूकदार व व्यवसायिक यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करता येते. यासाठी त्याच्यावर २आॅनलाईन गुन्ह्यांची नोंद हवी. त्याच्याविरूद्ध हिंसेचा गुन्हा असेल तरच ही कारवाई करता येते, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बैठकीत दिली.सीआरपीसी अ‍ॅक्ट अंतर्गत सुधारणा हवीएमएलआरसी कायद्यानुसार तहसीलदारांना वाहनजप्तीचे व उपविभागीय अधिकाऱ्यांना जप्त वाहन सोडण्याचे अधिकार दिले आहेत. यामध्ये सीआरपीसी कायद्यांंतर्गत दोन गुन्हे दाखल असताना ती व्यक्ती अवैध रेती वाहतूक करताना पुन्हा सापडल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊ शकते.