शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:06 IST

जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे.

वनाधिकाऱ्यांचे अभय : महारुख, कडूनिंब, आंबा, वडाचे शेकडो टन लाकूडअमरावती : जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. आरागिरणी मालकांसोबत वनाधिकाऱ्यांचे लांगेबांधे असल्यामुळे दररोज हजारो टन आडजात लाकूड आरागिरण्यांमध्ये फस्त होत आहे. वनाधिकाऱ्यांच्या अल्प लाभाच्या हव्यासापोटी जंगल नष्ट होत आहे. एकीकडे उपवनसंरक्षक हेमंत मीना हे जंगलाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे अधिनस्थ वनाधिकारी, कर्मचारी आरागिरणी मालकांकडून चिरीमिरी घेऊन आडजात लाकडाच्या कटाईला मूकसंमती देत आहेत. वनविभागाचा कारभार ‘दिव्याखाली अंधार’ असा सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकारी जंगल, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी धडपड करीत असले तरी कनिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दिवसाची सुरूवातच ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याशिवाय होत नाही. परिणामी जिल्ह्यात अवैध आडजात लाकूड कटाई करून मोठ्या प्रमाणात आणले जात आहे. अंजनगाव सुर्जी हे हल्ली आडजात लाकूड तस्करीचे केंद्र बनले आहे. शुक्रवारी कलाम सॉ-मिलमध्ये मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाई करून आणल्या जाणाऱ्या लाकडाचे छायाचित्र विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला पाठविले आहे. तसेच जुन्या बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या आर. के. स्टीलमध्ये देखील अवैध लाकूड आणले आहे. आडजात लाकूड कापण्याला मनाई असुनही परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. बारखडे आरागिरण्यांवर कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वृक्ष कटाईचे वास्तव वेगळेचअमरावती : परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार आदी भागात अवैध लाकूड कापणे सुरुच असल्याची माहिती आहे. परंतु उपवनसंरक्षक हेमंत मीना आडजात वृक्षकटाई आणि आरागिरण्यांना अवैध लाकूड कापण्याबाबत आढावा घेतात तेव्हा ‘सर सब कुछ बंद है’ असा सूर सर्वच वनपरिक्षेत्राधिकारी आळवतात. मात्र, आडजात वृक्षकटाईची वास्तविकता वेगळीच आहे. यापूर्वी देखील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदीच्या काठावर आडजात वृक्षांचे लाकूड मोठ्या प्रमाणात बेवारस आढळले होते. अखेर उपवनसंरक्षकांनी येथे धाडसत्र राबवून लाकूड जप्त केले होते. आरागिरणीत दरदिवसाला आणले जाणारे अवैध लाकूड रोखण्यासाठी उपवनसंरक्षकांनी आरागिरण्यांमध्ये आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवावे, अशी मागणी वृक्षप्रेमिंनी केली आहे. (प्रतिनिधी)उपवनसंरक्षकांना दिली जाते खोटी माहितीआरागिरणीत अवैध लाकूडकटाई सुरु असताना काहीच नियमबाह्य सुरु नसल्याची खोटी माहिती कनिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून उपवनसंरक्षकांना दिली जाते. वन विभागात ‘आॅलवेल’ असल्याचे भासवून आरागिरणी मालकांना अवैध व्यवसायासाठी बळ देण्याचे कटकारस्थान वनपरिक्षेत्राधिकारी, वनपालांकडून रचले जात असल्याचे चित्र आहे.