शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

साडेसतरा कोटींची मदत वितरित

By admin | Updated: March 24, 2016 00:35 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : ३७ हजार हेक्टरमधील पीके होती बाधित अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी शासनाने १७ मार्च रोजी १७ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला होता. हा निधी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. पुढच्या आठवड्यात हा निधी बाधीत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. सन २०१४ मध्ये मे ते आॅक्टोबर दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट व अतीवृष्टी यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ क्षेत्र बाधीत झाले. यामध्ये भात पिकाचे २० आर, कपाशी ५ हजार ८०८ हेक्टर, सोयाबीन १० हजार ४१ हेक्टर, तूर १६ हजार ५४२ हेक्टर, मूग व उडीद ३ हजार १८५ हेक्टर, ज्वारी ६५ हेक्टर, व इतर १८६ हेक्टर शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. तसेच फळपीकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी असे एकूण १ हजार १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधीत क्षेत्राला ३० जानेवारी २०१४ चे शासन निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रास ४ हजार ५०० हेक्टर,ओलीताखालील पिकांना ९००० रुपये हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांसाठी १२ हजार रुपये प्रती हेक्टर, रुपये वाटप करण्यात आले आहे. खरीप २०१४ (अवर्षण) मध्ये वाटप रक्कम वगळता उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून कोरडवाहू ५ हजार ५०० रुपये, ओलीताखाली ६ हजार रुपये व बहुवार्षीक पिकांकरिता १३ हजार रुपये हेक्टर या प्रमाणे प्रती हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर या मर्यादित वाटप करण्यात येणार आहे. या मदतीमधून बँकेने शेतकऱ्यांची कर्जकपात व अन्य कुठलीही कपात करु नये असे निर्देश आहे. २००७ मधील घरांच्या नुकसानीसाठी  साडेसात कोटी मंजूर जिल्ह्यात २००७ मध्ये अतिवृष्टी व पूर नुकसान झालेल्या ४३ गावामधील ४ हजार १२२ घरांच्या बांधकामास लाभार्थी घर बांधणार या तत्वावर शासनाने मान्यता दिली. यासाठी शासनाने १० कोट ६६ लाख ९० हजार इतका निधी मंजूर केला व यापैकी ७० टक्के म्हणजे ७ कोटी ४६ लाख ८३ हजार इतका निधी शासनाने जिल्ह्याला वितरित केला आहे.हा निधि ३१ मार्च २०१६ पर्यंत बाधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.