शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाळा येथील सिंगल फेज लाईन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

मागील दीड ते दोन महिन्यापासून मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्री-बेरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ...

मागील दीड ते दोन महिन्यापासून मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्री-बेरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्याकुट्ट अंधारात विंचू, साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला होता. शेतामध्ये रात्रीच्या वेळी पिकांची चाकरी करणारे शेतकरी व शेतात वास्तव्यास असणारे रखवालदार यांना सिंगल फेज लाईन बंद असल्यामुळे त्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला होता. सध्या 90 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पेरणी आटोपली असून गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पेरलेले पीक वर येण्यासाठी रात्री-बेरात्री पाणी सोडण्यासाठी शेतात जावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेऊन मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन त्वरित सुरू करण्यात यावी. अन्यथा प्रहार युवा संघटनेच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला होता. परिणामी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्येचा सतत पाठपुरावा सुद्धा केला. अखेर मराविम कंपनीने शेतकरी शेतमजूर व शेतात राहणाऱ्या रखवालदाराची व्यथा जाणून घेतली व सिंगल फेज लाईन सुरु करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता अवघड यांचे प्रहार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पाळा येथील युवा सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपत नेवारे, प्रहारचे कार्यकर्ता नरेंद्र सोनागोते, राजूभाऊ बीसाद्रे, किशोर वानखडे, अंजुमनशहा उपस्थित होते.