शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी नुतनीकरण, भोजनालय सुरुच

By admin | Updated: November 3, 2016 00:15 IST

रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे.

बडनेऱ्यातील घटना : अग्निकांडाच्या घटनेबाबत संशय बडनेरा : रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे. ही आग शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे लागली की लावली? यादिशेने तपास केल्यास अनेक बाबीचा उलगडा होईल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या दिवशी आर. आर. नामक भोजनालयास आग लागली. आगीने रौद्र रुप घेतले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे प्रशासनाने नुकतेच वृंदावन रेस्टारेंट, हैद्राबाद यांना रेल्वे स्थानकावरील भोजनालयाचे कंत्राट दिले आहे. या भोजनालयाच्या नूतनीकरणाचे कामकाज सद्या सुरु आहे. दरम्यान भोजनालयात खाद्य पदार्थ, जेवन, फराळ आदी साहित्य तयार करणे व त्यांची विक्री करण्याचे देखील सुुरु आहे. एकाच वेळेस नूतनीकरण व व्यवसाय करणे नियमाला धरुन आहे का? हे रेलवे प्रशासनाला तपासावे लागेल. ज्या भोजनालयात आग लागली, त्यामध्ये नव्याने वीज केबल टाकण्याचे काम सुरु आहे. ज्या भोजनालयात आग लागली, तेथे ५ ते ६ गॅस सिलिंडर होते. एवढे सिलिंडर कशासाठी ठेवण्यात आले होते. ते भरले होते की रिकामे याकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर रेल्वेस्थानकाला मोठा धोका पोहचला असता हे वास्तव आहे. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते काय? हा सवाल देखील या आगीच्या निमित्ताने समोर आला आहे. या घटनेनंतर बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी, नागरिक, रेल्वे कर्मचारी खरेच सुरक्षित आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भोजनालयात यापूर्वी देखील दोनदा आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.चौकशी समिती गठित रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडनेऱ्याच्या रेल्वे स्थानकावरील भोजनालयातील आगीच्या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. सिनियर डीसीएम सुनील मिश्रा हे स्वत: येथे आले होते. ही चौकशी समिती अहवाल रेल्वेच्या महाप्रबंधकांना पाठविणार आहे. त्यानंतरच आगीचे नेमके कारण समोर येणार आहे. आगीने रौद्ररुप घेतले असते तर मोठी दुर्घटना रेल्वे स्थानकावर घडली असती. याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देवून आहेत.