शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

एपीआय, पीएसआयसह दहा कर्मचाऱ्यांना 'शो कॉज'

By admin | Updated: September 3, 2014 23:00 IST

पोलीस ठाण्याच्या वार्षिक अहवाल तपासणीत दोषी आढळलेल्या बडनेरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

अमरावती : पोलीस ठाण्याच्या वार्षिक अहवाल तपासणीत दोषी आढळलेल्या बडनेरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी ही कारवाई केली.कुठलाही तक्रारकर्ता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यास त्याची तक्रार नोंदवून तक्रारकर्त्याला तक्रारीची दुय्यम प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निर्गमित केले आहे. परंतु बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी तक्रारकर्तांना तक्रार दाखल केल्याची प्रत दिली नाही. काही जणांनी पोलीस ठाण्यातील क्राईम रजिस्टरमध्ये रीतसर वार्षिक नोंदी घेतल्या नाहीत. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी बडनेरा पोलीस ठाण्याचे वार्र्षिक निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी ३० आॅगस्ट रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे, उपनिरीक्षक नरेंद्र पेंदोर, विलास पवार, विजय चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कोकाटे, रामराव बडे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू मोहोड, विजय अडोकार, प्रशांत कात्रे, विजय सावरकर या दहा जणांना ५०० रुपये दंड का ठोठावण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील काहींची सध्या दुसऱ्या पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. या नोटीशीचे उत्तर देण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.