शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

अत्यल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत ...

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात. पावसाचे दिवस कमी असले तरीही या पिकांचा कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना मालामाल करू शकते.

बॉक्स

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

वर्ष पेरा हेक्टरमध्ये

२०१७ २९१२००

२०१८ २९१६००

२०१९ २४८४००

२०२० २९४२००

२०२१ २६७०००

झटपट येणारे सोयाबीन

जे एस - २००३४, जे एस ९५-६०जेएस-९३-०५, पीडीकेयू अंबा, एनआरसी १४२, एनआरसी १३८

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

सुवाना सोया, पीडीकेयू येलो, गोल्ड, एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एनआरसी - ८६

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

एमएयूएस-११८८, फुले संगम, फुले किमया, एनआरसी-३७, जेएस-९७-५२ हे वाण उशिरा येणारे आहेत.

---

शेतकरी म्हणतात....

यंदा अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन पेरले. पिकाची स्थितीसुद्धा उत्तम होती. मात्र, ऐन फुलोरावर असताना पाऊस राहिल्याने अळ्याचा मारा होऊन पूर्ण फुले फस्त केल्याने शेंगाच धरल्या नाही. यंदा सवंगणीचीही संधी मिळणार नसल्याने मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

- गोपाल सगणे, शेतकरी, सावळापूर

---

यंदा अर्ली व्हेरायटी सोयाबीनच्या पाच बॅग पेरणी केली. शेंगाही बऱ्यापैकी आहेत. मात्र, सध्या सततचा पाऊस पिकासाठी धोकादायक ठरण्याची भीती वाटू लागली आहे. १५ दिवसांची उसंत मिळाल्यास बऱ्यापैकी उत्पादन होण्याची आशा आहे.

- बलदेव चव्हाण,

शेतकरी, मांजरी म्हसला

सोयाबीनचे वाण विविध कालावधीसाठी उपलब्ध आहे. जमिनीचा पोत, सिंचन सुविधा आणि पीक पद्धतीवर वाणाची निवड अवलंबून असते. ऑफ सिझनमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्यास ग्रीन मोझॅक व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनक्षमता अतिशय घटते. तसेच पुढील हंगामातील पिकांवर रोग येण्याची शक्यता असते.

- डॉ. सतीश निचळ,

सोयाबीन शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती