चैतन्य कॉलनीतील घटना : चिमुरड्या बालिकांशी अश्लाघ्य वर्तनअमरावती : स्टेशनरी दुकानात साहित्य खरेदीकरिता येणाऱ्या बालिकांशी लैंगिक चाळे करणाऱ्या दुकानदाराला महिलांनी मंगळवारी बेदम चोप देऊन त्याची शहरात धिंड काढली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. चैतन्य कॉलनीतील हा प्रकार उघड होताच युवा स्वाभिमानी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मोहन पा. गाडगे (५२) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे चैतन्य कॉलनीत ‘ओम कलेक्शन व स्टेशनरी’ नामक दुकान आहे. दुकानात विविध वस्तुंच्या खरेदीसाठी येणाऱ्या बालिकांसोबत मोहन गाडगे हा अश्लिल चाळे करीत असल्याचे पत्र १० मार्च रोजी आ.रवी राणा यांना प्राप्त झाले होते. तेव्हापासून युवा स्वाभिमान संघटना याकडे लक्ष ठेवून होती. युवा स्वाभिमानच्या महिला आक्रमकअमरावती : युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील काही युवकांना या दुकानदारावर ‘वॉच’ ठेवण्याच्या सूचना दिल्या होेत्या. काही गैरप्रकार आढळल्यास त्याचे चित्रण करण्यासही बजावले होते. त्यानुसार दोन ते तीन दिवस मोहन गाडगेच्या दुकानावर परिसरातील युवकांसह कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवले. दरम्यान, दुकानदार गाडगे हा एका १२ वर्षिय बालिकेसोबत चाळे करताना आढळून आला. ही व्हिडिओ क्लिप युवकांनी युवा स्वाभिमान संघटनेला पाठविली. त्याआधारे संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास या दुकानावर धडक दिली. यामध्ये स्वाभिमानी महिला आघाडीच्या सुमती ढोके, वंदना जामनेकर, लता अंबुलकर, शालीनी देवरे, ज्योती सैरिसे यांच्यासह संघटनेचे विनोद गुहे, संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, तुषार पाठक, अभिजीत देशमुख यांनी चैतन्य कॉलनीत जाऊन मोहन गाडगे याला जाब विचारला. मात्र, त्याने या प्रकाराबाबत साफ नकार दिला. त्यामुळे संतप्त महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी दुकानदाराला दुकानाबाहेर ओढून चांगलाच चोप दिला व त्याची धिंड काढली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी दुकानदाराला संतप्त नागरिकांच्या तावडीतून सोडविले. त्याला फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित मुलीचे वडिल बाहेरगावी असल्याने तक्रार करण्यास उशीर झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)एसीपी देशमुख घटनास्थळी दाखलनागरिक दुकानदाराला चोप देत असल्याची माहिती मिळताच एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांच्यासह फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. लगेच मोहन गाडगे याला ताब्यात घेण्यात आले.लैंगिक चाळे करण्याचा प्रकार घडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तक्रार दिल्यास आरोपीवर कारवाई करण्यात येईल. बालिकेचे वडिल सध्या उपस्थित नसल्यामुळे अद्याप तक्रार नोंदविली गेली नाही. - रियाजुद्दीन देशमुख, सहायक पोलीस आयुक्त.११ मिनिटांची व्हिडिओ क्लिपयुवा स्वाभिमानीने चैतन्य कॉलनीतील काही युवकांना दुकानदारावर ‘वॉच’ ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार काही युवकांनी लक्ष ठेवून व्हिडिीओ क्लिप काढली. ही क्लिप ११ मिनिटांची असून त्यामध्ये दुकानदार मोहन गाडगे हा एका १२ वर्षीय बालिकेशी अश्लील चाळे करताना आढळून आला. त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला असून ती क्लिप युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली.
अश्लील चाळे करणाऱ्या दुकानदाराची काढली धिंड
By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST