शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अंबादेवी संस्थानला ‘शो-कॉज’ नोटीस

By admin | Updated: December 5, 2015 00:16 IST

नवरात्रोत्सवात अंबादेवी संस्थानने निमंत्रण पत्रिकांद्वारे जवळच्या लोकांनाच महाप्रसादाचा लाभ घेण्यास बोलावल्याने अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले, ....

अमरावती : नवरात्रोत्सवात अंबादेवी संस्थानने निमंत्रण पत्रिकांद्वारे जवळच्या लोकांनाच महाप्रसादाचा लाभ घेण्यास बोलावल्याने अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या धर्मदाय सहआयुक्तांनी अंबादेवी संस्थानच्या चौकशीचे निर्देश निरीक्षकांना दिले आहेत. या चौकशीत संस्थानने सहकार्य न केल्याने विश्वस्तांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे. अंबा व एकवीरा देवीच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात संस्थानाची चौकशी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत सुरू आहे. त्यातच नवरात्रोत्सावात अंबादेवी संस्थानतर्फे पत्रिकावाटप करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पत्रिका ओळखीतील व्यक्तिनांच वितरित करून निमंत्रण देण्यात आल्याने अनेक सामान्य भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले. महाप्रसाद घेण्याकरिता गेलेल्या अनेक भाविकांना प्रवेशद्वारापासून हाकलून लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. विश्वस्तांना तिसऱ्यांदा तारीखअमरावती : यासंदर्भात 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली होती. हजारो भाविकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताला समर्थन दर्शवून संस्थानाच्या कारभारावर अंकुश ठेवण्याची मागणी केली होती. ‘लोकमत’च्या या वृत्ताचे कात्रण मुंबई येथील धर्मदाय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. या बाबीची अमरावती विभागातील धर्मदाय सहआयुक्त ओ.पी. जयस्वाल यांनी दखल घेऊन अंबादेवी सस्थानची चौकशी सुरु केली आहे. चौकशीचे काम निरीक्षक डी.एस. नामकासे व आर.ए. गुल्हाने यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या चौकशीत संस्थानाकडून वार्षिक अहवाल व विविध प्रकारच्या २० मुद्यांवर स्पष्टीकरण मागविले आहे. मात्र, अद्याप अंबादेवी संस्थानकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य निरीक्षकांना मिळाले नसून अहवालसुध्दा देण्यात आला नाही. त्यामुळे अंबादेवी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. संस्थानातील पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी दोन वेळा तारीख देण्यात आली. मात्र, अद्याप विश्वस्तांपैकी कोणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे आता संस्थानच्या विश्वस्तांना तिसऱ्यांदा तारीख देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.