शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून भाजप कार्यालयासमोर जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST

अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीतदेखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख ...

अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीतदेखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख पराग गुडधे, श्याम धाने व अन्य शिवसैनिकांनी भाजपच्या राजापेठ स्थित कार्यालयाच्या आवारातील फलकांची जाळपोळ केली. तेथे दगडफेक करून भाजप व राणेंविरोधी नारेबाजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास हे तडकाफडकी आंदोलन करण्यात आले.

एका संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. कार्यालयातील नामफलकावर शाई फेकण्यात आली, तर काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुमारे अर्ध्या तासाच्या या तडक आंदोलनाची शिवसैनिकांकडूनच व्हिडीओ शूटिंग करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह भाजपचे तुषार भारतीय व पदाधिकारी पोहोचले. तात्काळ क्यूआरटी पथकासह अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली.