शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चांदूरबाजार तालुक्यात होणार २२२ ठिकाणी शक्तीची उपासना

By admin | Updated: October 11, 2015 01:44 IST

यावर्षीच्या नवरात्रौत्सवात तालुक्यात २२२ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा व शारदा देवीची प्रतिष्ठापना करून सामूहिकरीत्या शक्तीची उपासना केली जाणार आहे.

सुमित हरकूट चांदूरबाजारयावर्षीच्या नवरात्रौत्सवात तालुक्यात २२२ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा व शारदा देवीची प्रतिष्ठापना करून सामूहिकरीत्या शक्तीची उपासना केली जाणार आहे. यात १५९ दुर्गादेवीचा व ६३ शारदा देवींचा समावेश आहे. या उत्सवात सार्वजनिक देवींची संख्या पाहता शक्ती उपासनेवर देवीभक्तांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असल्याचे जाणवते. १३ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या नवरात्रौत्सवामध्ये २२२ पैकी ४४ गावांमध्ये एक गाव एक दुर्गा व एक गाव एक शारदा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चांदूरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत ११७ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव व शारदा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यामध्ये विविध ठिकाणी ९० दुर्गा व २७ शारदांची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन नवरात्राची उपासना केली जाणार आहे. यात शहरामध्ये ११ दुर्गा व ३ शारदा विराजमान होणार असून ग्रामीण भागात ७९ दुर्गा व २४ शारदा विराजमान होणार आहेत. या पोलीस स्टेशन अंतर्गत २१ गावांमध्ये एक गाव एक दुर्गा व ७ गावांमध्ये एक गाव एक शारदा हा उपक्रम राबविल्या जात आहे. या स्तुत्य उपक्रमामध्ये सर्फाबाद, बोरज, आखतवाडा, खरवाडी, खराळा, चिंचोली काळे, सांभोरा, चिंचकुंभ, वडाळा, थूगाव, हैदतपूर, पिंपरी पूर्णा, निंभोरा, रेडवा, माधान, काजळी, कोदोरी, विश्रोळी, जालनापूर, डोमक, परसोडा, पिंपळखुटा, वाठोंडा, राजूरा, फुबगाव, बेलमंडळी, सोनोरी, शहापूर आदी गावांनी आपला सहभाग दर्शविला आहे. आसेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ ठिकाणी सार्वजनिकरीत्या शक्ती उपासना केली जाणार असून १७ दुर्गादेवी व १२ शारदादेवी मंडळांचा समावेश आहे. या पोलीस स्टेशनमध्ये १६ ठिकाणी एक गाव एक दुर्गा हा उपक्रम राबविल्या जाणार असून यात १४ दुर्गादेवी व २ शारदादेवींचा समावेश आहे. तालुक्यात हे ठाणे गणेश उत्सवाप्रमाणे, नवरात्र उत्सवातही या उपक्रमात आघाडीवर आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता या ठाण्याचे ठाणेदार बाबाराव अवचार व खुफिया हवालदार विकास धंडारे यांनी परिश्रम घेत आहेत. आसेगाव ठाण्यातील या उपक्रमात सहभागी झालेली गावे, राजना पूर्णा, अमृल्लापूर, खाजनापूर, टाकरखेडा पूर्णा, कृष्णापूर, धानोरा पूर्णा, दहिगाव पूर्णा, विसेगाव, हिवरा, तळणीपूर्णा, येवता, येलकी, विरुळ पूर्णा, नबापूर व आसेगाव या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील शिरजगाव ठाण्यांतर्गत एकूण ८६ देवींची शक्ती उपासनेसाठी सार्वजनिक देवींची स्थापना करण्यात येणार आहे. तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनमधील एकूण ९ गावे दुर्गा उत्सवामध्ये संवेदनशिल असून यात चांदूरबाजार ठाण्यात पाच, आसेगाव व शिरजगाव कसबा ठाण्यात प्रत्येकी दोन गावांचा समावेश आहे. या संवेदनशिल गावामध्ये चांदूर ठाण्यातील ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, थुगाव, बेलोरा, चांदूरबाजार तर आसेगाव ठाण्यातील पूर्णानगर, राजणा व शिरजगाव ठाण्यातील करजगाव, शिरजगाव कसबा गावांचा समावेश आहे. त्यासाठी बंदोबस्तासाठी या तिन्ही ठाण्यांनी वरिष्ठांकडे अतिरिक्त पोलीस बलाची मागणी केली आहे. या नवरात्र उत्सवावर आसेगाव ठाण्यासह चांदूरबाजार ठाण्याचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत व शिरजगावचे ठाणेदार विलास चौगुले यांचेसह राजू हिरुळकर, सचिन भुजाडे हे लक्ष ठेवून आहेत.