शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना मिळणार शबरी, रमाई योजनेतून घरकूल

By admin | Updated: December 24, 2015 00:25 IST

राज्यातील अपंग बांधवांना शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात केली.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : बच्चू कडू यांचे प्रयत्न सार्थकीअमरावती : राज्यातील अपंग बांधवांना शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात केली. यात बीपीएलची अट राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला असता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. शबरी घरकूल योजना ही अनुसूचित जमाती तर रमाई घरकूल योजना ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे बीपीएल प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. आमदार बच्चू कडू यांनी अपंगांचे पुनर्वसन प्रश्न विधिमंडळात रेटून धरताना आदिवासी अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील अपंग बांधवांना घरकुलचा लाभ मिळावा, ही मागणी रेटून धरली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी स्वत: मान्य करून बिपीएलची अट वगळून शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ अपंग बांधवांना १ जानेवारी नवीन वर्षांपासून दिला जाईल, अशी घोषणा केली. शबरी घरकूल योजना ही आदिवासी विकास विभाग तर रमाई घरकूल योजना ही सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाईल, हे स्पष्ट केले. तसेच ओबीसी, खुल्या प्रवर्गातील अपंग बांधवांसाठी येत्या दोन महिन्यांत संत गाडगेबाबा यांच्या नावाने घरकूल योजना राबविली जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात ७० ते ८० लाख अपंगांची संख्या आहे. शबरी, रमाई घरकुल योजनेतून १५ ते २० लाख अपंगांना लाभ मिळेल. गत काही वर्षांपासूनचा अपंगांच्या पुनर्वसनाचा लढा सुरू असताना आज तो मार्गी लागला आहे. ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी घरकुल योजना लवकरच सुरू होईल. - बच्चू कडू, आमदार, अचलपूर