पान २ चे लिड
फोटो पी ०६ प्लांट नावाने
प्रदीप भाकरे
अमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील ३१३ शहरांमध्ये मैला प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील १४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. प्रक्रिया प्रकल्पांमध्ये हायब्रीड कोअर टेक्नाॅलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देऊन प्रकल्प बांधणीला नगरविकास विभागाने ५ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, शेंदुरजना घाट व वरूड या पालिका व भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व धारणी या नगर पंचायत क्षेत्रात मैला प्रक्रिया केंद्र (एफएसटीपी) उभारली जाणार आहेत. त्यातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
राज्यातील ७३ शहरांमधील शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैला सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया होत आहे. उर्वरित शहरांमधील सेप्टिक टँकमधील मैला सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून प्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यासाठी हायब्रीड कोअर टेक्नाॅलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
---
बॉक्स १
हायब्रीड तंत्रज्ञान का?
मैला प्रक्रिया केंद्रासाठी ‘शेड्युल डेस्लुडगिंग’चा पर्याय समोर आला होता. त्यानुसार शहरातील मैल्यावर प्रक्रिया करावयाची झाल्यास प्रत्येक शहराला जास्त क्षमतेचे एफएसटीपी प्रकल्प उभारावे लागतील. सद्यस्थितीत काही नगर पालिका, नगर पंचायतींकडे स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कमीत कमी जागेमध्ये राबविणे शक्य असलेल्या हायब्रीड कोअर टेक्नाॅलॉजी या तंत्रज्ञानास मान्यता देण्यात आली आहे.
असे असतील जिल्ह्यातील प्रकल्प
शहर आणि दरदिवशाची क्षमता किलोलीटरमध्ये
अचलपूर १०२ किलोलीटर,
अंजनगाव ५४,
भातकुली ९,
चांदूर रेल्वे २२,
चांदूरबाजार १९,
चिखलदरा ८,
दर्यापूर ४५,
धामणगाव रेल्वे २७,
धारणी १९,
मोर्शी ४४,
नांदगाव १७,
शेंदुरजनाघाट २४,
तिवसा १८,
वरूड ५०
--------------