शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2016 00:46 IST

२० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

ग्रा.पं.चे सहकार्य : गावकऱ्यांची होणार सोयवनोजा बाग : २० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे. या गावतलावमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे होणार असून जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. परिसरातील शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सातेगावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या तलावासाठी युवा समाजसेवक महेश खारोडे यांनी सतत २० वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.या जमिनीवर अतिक्रमण केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनीसुद्धा समजूत काढूून फार मोठा अडथळा दूर करून अधिकारी-शासन, असा कागदपत्रांचा प्रवास सातत्याने करून तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर, मातकर, ईश्वरकर, बाबरेकर यांचे विशेष सहकार्य घेऊन गावतलाव निर्माण करण्याचे ध्येय पूर्णत्वास आले. भविष्यात गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करू शकतो, हेच ध्येय समोर ठेवून सातेगाव येथे २० वर्षांच्या तलावाच्या निर्मितीचा सुखकर प्रवास यशस्वी झाला आहे. तलावाच्या संरक्षण सर्वे करताना गावातील राजकीय विरोधी मंडळींनी अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही संरक्षणातच तलावाचा सर्वे आराखडा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु गावकऱ्यांच्या व अतिक्रमणधारकांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यासाठी महेश खारोडे यांनी पाणी प्रश्नावर गावात जास्तीत जास्त पाणवठ्याची जलशिवाराची कामे आपल्या भागात कशी जास्त केली जातील, यासाठी अण्णा हजारे, पोपटराव पवार नाम फाऊंडेशन यांच्यासोबतसुद्धा पाण्यावर जास्तीत जास्त काम कसे करता येतील, नदी-नाल्यावर बंधारे, शेततळे, पाणी पश्नावर चर्चा लेख लिहून पाण्यासाठी जास्तीत जास्त काम करत असतात. या कामातूनच आपल्या गावात त्यांनी मोठा गावतलाव निर्मितीचा उद्देश साध्य केला आहे. या तलावाच्या कामामुळे सर्व गावकरी, शेतकरी समोरील पाण्याचा संकटापासून भयमुक्त होऊन आनंदी झाले.(वार्ताहर)