शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना

By admin | Updated: August 27, 2016 23:57 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

विश्रामगृहात बैठक : सर्वपक्षीय महामोर्चाची तयारीअमरावती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी धामणगाव येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. दादाराव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत ३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमशाळेत प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा नरबळी देण्याच्या उद्देशाने गळा कापण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. 'लोकमत'ने निर्भीडपणे नरबळी प्रकरणातील तथ्य बाहेर काढलीत. या घटनेची सीआयडी चौकशी झाल्यास यापूर्वी घडलेल्या अनेक घटना उघडकीस येतील, असा विश्वास अ‍ॅड.संजय वानखडे यांनी व्यक्त केला. विविध संघटना उपस्थित अमरावती : प्रशासन न्याय देत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर हजारो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नरबळी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल,असे बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.या बैठकीला अमरावतीसह यवतमाळ ,वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आश्रमाचे अध्यक्ष शंकर महाराज यांचे आजपर्र्यत साधे बयानही घेतले नसल्याने यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची कैफीयत पदाधिकाऱ्यांनी मांडली.बैठकीला रुपेश खडसे,गणेशदास गायकवाड,महादेव खंडारे,विजय गायकवाड,रंजित पाटेकर,उमेश भुजाडणे ,देवाननद वानखडे,संतोष वाघमारे,निलेश वानखडे,सर्फराज खान आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)नरबळीप्रकरणी सोमवारी अंजनसिंगी बंद अंजनसिंगी : पिंपळखुटा आश्रम परिसरातील नरबळीप्रकरणी प्रमुख सूत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी सोमवार २९ आॅगस्ट रोजी अंजनसिंगी येथे सर्वपक्षीय बंदची हाक दिली आहे. येथील ग्रामपंचायत भवनातून गावात निषेध रॅली काढण्यात येऊन तिचा बसस्टॉपसमोर समारोप होणार आहे. सरपंच अवधूत दिवे, भाकपचे अशोक काळे आदी सभेला संबोधित करणार आहेत.