शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या सेवेला सन्मान मिळावा

By admin | Updated: May 12, 2015 00:17 IST

आधुनिक परिचर्येच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन परिचारिका दिन म्हणून...

सेवाभाव : दूषित दृष्टिकोन बदलण्याची गरज, फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन वसंत कुळकर्णी तळेगाव दशासरआधुनिक परिचर्येच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रूग्णसेवेच्या कार्यातील त्यांच्या नियमित कार्यामुळे तयंना ‘लेडी विथ लँप’ असेही म्हटले जाते. त्यांनी परिचारिकांना शास्त्रीय पध्दतीने शिक्षण दिले. या दिवसाच्या निमित्ताने परिचर्या सेवेचे महत्त्व सगळ्यांना पटवून देण्याचा व या सेवेकडे पाहण्याचा पारंपरिक व दूषित दृष्टिकोन बदलण्यासाठी या दिवसाच्यानिमित्ताने प्रयत्न करूया. फ्लोरेंन्स नाईटिंगेल या विदूषीने सर्वप्रथम परिचर्या सेवेची संकल्पना समोर आणली. श्रीमंत कुटूूंबात जन्मलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी स्वेच्छेने परिचर्या सेवा पत्करली. छावण्यांमध्ये राहून त्यांनी जखमी आजारी सैनिकांची सेवा केली. इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ नर्सेस जिनिव्हा यांच्याकडून दरवर्षी परिचर्या सेवेच्या विविध पैलुंवर एक घोषवाक्य प्रसारित करण्यात येते. परिचर्या सेवेची सुुरूवात उपचारात्मक आरोग्य सेवेतून झालेली दिसलते. आजच्या आधुनिक युगात परिचर्या सेवेचा खूपच विकास झाले आहे. प्रतिबंधात्मक, आरोग्य संवर्धनात्मक, पुनर्वसनात्मक, अशा विविध स्तरांवर तिची उपयुक्तता सिध्द झाली आहे. ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागात राहून गावपातळीवर अहर्निशपणे देणाऱ्या आरोग्य सेविकेच्या कामाचे स्वरूप तसे भिन्न आहे. दुर्गम ग्रामीण भागात राहून सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना अनेक समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. परिचारिकांच्या जबाबदाऱ्या रूग्णांचे हसून स्वागत करणे, त्याला योग्य ते उपचार मिळवून देणे, रूग्णाला मार्गदर्शनाची गरज असल्यास परिस्थितीनुसार वरिष्ठांची मदत घेणे, रूग्णाच्या नातेवाईकांना योग्य सल्ला देणे, सर्व लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे.