शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून साकारला विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:13 IST

फोटो पी २० पुसला पुसला : लोकवर्गणी व युवकांच्या पुढाकाराने येथील जय भवानी आदिवासी आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष ...

फोटो पी २० पुसला

पुसला : लोकवर्गणी व युवकांच्या पुढाकाराने येथील जय भवानी आदिवासी आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. वरूड तालुक्यातील पुसला गावात कोरोनाच्या उद्रेकासह मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, गावात विलगीकरण कक्षाची आवश्यकता होती. त्यामुळे गावातील युवकांनी आश्रमशाळेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी क्षणाचा विलंब न लावता विलगीकरण कक्ष उभारण्याची परवानगी देण्यात आली.

जय भवानी आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष दिवंगत रत्नाकर अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आश्रमशाळेचे कोषाध्यक्ष रमेश श्रीराव यांच्या हस्ते शाळेतील विलगीकरण कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, सरपंच धनराज बमनोटे आदी उपस्थित होते. विलगीकरण कक्षात २० खाटांची व्यवस्था असून नास्ता, जेवण, ऑक्सिजन सिलिंडर व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील गरजू कोरोना रुग्णांनी लाभ घेण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुशील डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.